Bomb Threat At Taj Mahal: ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; तो ई - मेल नक्की कुठून आला?

Taj Mahal Threat : धमकीचा मेल आल्यानंतर ताजमहालाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Taj Mahal Bomb Spot
taj mahalGoogle
Published On

जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पर्यटन विभागाच्या मेलवर ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याचा आशय असलेला मेल आला आहे. या मेलनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. शिवाय सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी नेमकी कुणी दिली? हा ई-मेल नक्की कुणी पाठवला? याचा तपास सुरू आहे.

मेल नक्की कुणी पाठवला?

सात आश्चर्यांपैकी एक ताजमहालला भेट देण्यासाठी देशभरातूनच काय तर जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटकांची रीघ लागलेली असते. ताजमहालची किर्ती आणि सौंदर्य सातासमुद्रापार पोहोचलं आहे. याच ताजमहालला उडवून देण्याची धमकी आली आहे. पर्यटन विभागाच्या मेलवर या धमकीचा मेल आलाय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आहेत.

Taj Mahal Bomb Spot
Shocking Video: अति घाई संकटात नेई! दोन बस समोरासमोर धडकल्या, भीषण घटनेचा व्हिडिओ

पर्यटन विभागाच्या अधिकृत मेलवर ताजमहाल संदर्भात एक मेल आला. त्या मेलमध्ये ताजमहालात बॉम्बस्फोट घडवून आणू आणि नष्ट करू, अशी धमकी देण्यात आली आहे. शिवाय ताजमहालच्या आत बॉम्ब ठेवण्यात आल्याचाही उल्लेख त्या मेलमध्ये करण्यात आला आहे. हे रोखायचं असेल तर रोखून दाखवा, असं थेट आव्हानही या मेलमधून देण्यात आलं आहे.

या मेलमध्ये बॉम्बस्फोट नेमका कधी घडवून आणला जाईल? यांची वेळ देखील देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये बॉम्बस्फोटाची वेळ सकाळी नऊ वाजता निश्चित करण्यात आली आहे. हा मेल वाचताच पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवले. नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. यासह स्थानिक पोलिस, सीआयएसएफ आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील ही माहिती देण्यात आली.

ताजमहालच्या बाहेरील आणि आतील भागात सीआयएसएफने सखोल तपासणी सुरू केली आहे. यासाठी विशेष श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

अमृतसर एक्सप्रेसमध्ये बॉम्बची धमकी

ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आले असतानाच, अमृतसर एक्स्प्रेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या कंट्रोल रूममध्ये (नियंत्रण कक्ष) यासंदर्भातील धमकीचा फोन आला होता. मात्र, एक्स्प्रेसची तपासणी केली असता काहीच आढळून आलं नाही. त्यामुळं ही अफवा प्रथमदर्शनी स्पष्ट झालं.

अमृतसर एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा एक फोन आला होता. रेल्वे कंट्रोल रूममध्ये रफिक शेख नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. एक्स्प्रेसच्या लगेज डब्यातील दोन पांढऱ्या रंगांच्या गोण्यांमध्ये स्फोटके असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, तपास केला असता ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

Taj Mahal Bomb Spot
EVM : ईव्हीएम हॅकिंगचा आरोप, नेमकं तथ्य काय? मतदारांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com