Saif Ali Khan Health Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Health Update : शस्त्रक्रिया झाली, ICU मध्ये उपचार, सैफची प्रकृती आता नेमकी कशी? वाचा लेटेस्ट हेल्थ अपडेट

Saif Ali Khan attack : सैफ अली खानच्या घरात आलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने वार केला. त्यामुळे अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफची आता प्रकृती कशी आहे जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे अभिनेता आता रुग्णालयात दाखल आहे. वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात ही घटना घडली आहे.मध्यरात्री त्याच्या घरी चोर घुसला होता. त्याला पकडताना सैफला मोठी दुखापत झाली. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सैफ अली खान हेल्थ अपडेट

अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत त्याच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, "सैफ अली खान शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत."

सैफ अली खानच्या घरी चोरीची घटना मध्यरात्री घडली. चोरीच्या उद्देशने चोर घरात शिरले होते. त्यांनी सैफवर चाकूने हल्ला केला. ही घटना मध्यरात्री अडीच ते तीन वाजल्याच्या सुमारास घडली. चोर आणि सैफ अली खान यांच्यात खूप झटापट झाली. या झटापटीत सैफवर सहा ते सात वेळा चाकून वार करण्यात आले. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

सैफ अली खानच्या शरीरावर सहा जखमा झाल्या असून त्यातील दोन जखमा अतिशय खोल आहेत. सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराने वार केले. त्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केले. नकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. सैफच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, सैफची प्रकृती आता ठीक आहे आणि डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई पावसाने ठप्प : सांताक्रूझमध्ये रस्ते पाण्याखाली, वाहनचालकांची मोठी तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Nanded News: छाती इतक्या पाण्यातून बैलगाडीतून जीवघेणा प्रवास, नांदेडमध्ये शेतकर्‍यांवर अस्मानी संकट, पाहा व्हिडिओ

Shocking News : पुणे हादरलं! अल्पवयीन मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

ED Raid : काँग्रेस आमदाराच्या घरी ईडीची छापेमारी, कोट्यवधीचे घबाड मिळालं, ६.७ किलो सोनं जप्त

SCROLL FOR NEXT