ranveer singh  Instagram
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: ‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून समन्स

‘न्यूड फोटोशूट’ चांगलचं भोवलं, पोलीस घरी पोहोचले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) अडचणीत वाढ होणार आहे. कारण अभिनेत्याला त्याच्या न्यूड मॅगझिन फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. गेल्या महिन्यात रणवीर या फोटोशूटमुळे खूप चर्चेत होता. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. एवढेच नाही तर अभिनेत्याविरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या.

हे देखील पाहा -

समन्स अंतर्गत येत्या २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश रणवीरला देण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलीस रणवीरला नोटीस देण्यासाठी अभिनेत्याच्या घरी गेले होते, परंतु त्यावेळी रणवीर घरात उपस्थित नव्हता.त्यामुळे येत्या १६ ऑगस्ट रोजी ही नोटीस त्याला सोपवली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी रणवीरने एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ झाला होता. या फोटोवरून अनेकांनी रणवीरवर टिका देखील केली होती. तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला.

त्यानंतर रणवीरविरोधात मुंबईत एका खासगी संस्थेने तसेच महिला वकिलाने पोलिसात तक्रार दिली होती. रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या एनजीओकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी आता रणवीरला मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: पायलटला सलाम! मुंबईच्या मुसळधार पावसात विमानाचे यशस्वी लॅडिंग, थरारक व्हिडीओ पाहिलात का?

Watch VIdeo : प्रवासी बस ट्रकला धडकली अन् पेटली, ७१ जणांचा मृत्यू, १७ चिमुकल्यांचाही समावेश

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

India Tourism : भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? मोजक्या लोकांना माहितीये

SCROLL FOR NEXT