Ranveer Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंगला व्हायचे आहे महानायक, व्यक्त केली लहानपणीची इच्छा

एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीर सिंगने 'बिग बी' यांच्यासारखे बनण्याची इच्छा व्यक्त केली .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखे बनण्याचे स्वप्न अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचे असते. अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच प्रभावित करते. फारच कमी कलाकार त्यांच्या इतके यशस्वी झाले आहेत. 'बिग बी' यांनी नुकताच ८० वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा 'गुड बाय' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणवीर सिंगने अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२'च्या मंचावर आपला भावना व्यक्त करत रणवीरने अमिताभ बच्चन त्याचे आदर्श असल्याचे सांगितले आहे. रणवीरला अमिताभ यांच्यासारखे बरीच वर्ष काम करायचे आहे.

रणवीरला नुकताच एक पुरस्कार (Award) मिळाला आहे. या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात रणवीरने त्याला अमिताभ बच्चन सारखे व्हायचे आहे आणि पुढेही त्याची हिच इच्छा असेल, असे त्याने सांगितले आहे.

रणवीर सिंग (Ranveer Singh) यावर स्पष्टीकरण देत म्हणाला, मला त्यांच्यासारखे व्हायचे आहे म्हणजे मला त्यांच्यासारखे वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत काम करायचे आहे, ते कसे अजूनही फक्त अॅक्टिंग करत आहेत. रणवीर सिंगवर अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा प्रभाव आहे. अमिताभ रणवीरचे आदर्श तर आहेतच परंतु त्याला त्यांच्या पावला पाऊल टाकण्याची इच्छा सुद्धा आहे.

आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन यांच्यासह रणवीर सिंग‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात (Movie) दिसणार आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी, २०२३ला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणवीर सिंग रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे सुद्धा आपल्याला दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT