Siddharth Jadhav And Ranveer Singh  Saam Tv
मनोरंजन बातम्या

BaalBharati Marathi Movie: सिद्धुच्या चित्रपटाला 'या'बॉलिवूड कलाकाराने दिल्या खास शुभेच्छा

बॉलिवूडमधील धडाडीच्या कलाकारांपैकी असलेला एक कलाकार म्हणजे रणवीर सिंग. रणवीर सिंग नेहमीच आपल्या एनर्जिटीक स्टाईलमुळे चर्चेत असतो.

Chetan Bodke

BaalBharati Marathi Movie: बॉलिवूडमधील धडाडीच्या कलाकारांपैकी असलेला एक कलाकार म्हणजे रणवीर सिंग. रणवीर सिंग नेहमीच आपल्या एनर्जिटीक स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याच्या मस्तीखोर वागण्याने, युनिक स्टाईलमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगला असतो. रणवीर आपल्या अभिनयासोबत अभिनयातील कौशल्यामुळे चर्चेत असतो.

रणवीर इंडस्ट्रीतील सहकलाकारांबरोबर अतिशय आपुलकीने वागतो. रणवीर आणि मराठीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव या दोघांची मैत्री ही सर्वश्रृत आहे. सिद्धार्थच्या 'बालभारती' या आगामी मराठी सिनेमाचं प्रमोशन रणवीरनं केलं आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत असलेला बालभारती मराठी चित्रपट आजपासून सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंगने आपल्या लाडक्या मित्राच्या सिनेमाचे प्रमोशन एका व्हिडिओतून केले आहे. रणवीरचा हा व्हिडिओ सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून रणवीरच्या आणि सिद्धार्थच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

कारण सिद्धार्थनं शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीरनं सुंदर मराठी बोलला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतो, ' मी सिद्धार्थच्या बालभारती सिनेमाचा ट्रेलर पाहिला. सिद्धार्थ हा मराठी सिनेसृष्टीतील गुणी कलाकार आहे. त्याचा बालभारती हा सिनेमा दोन डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. दादा के जलवे.... दादा आय लव यू...' असं म्हणत रणवीरने सिद्धार्थच्या बालभारती सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी रणवीरचे तोंडभरुन कौतुक केले आहे. एका युजरने कमेंट केली की, सिद्धार्थनं आणखी एका सेलिब्रेटीला मराठी बोलायला लावलं अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने लिहिले की, 'सर तुम्ही मराठी खूप सुंदर बोलता तुमची ऊर्जा ही तुमच्या कामातून आणि मेहनतीतून प्रेक्षकांना स्पष्ट दिसते.'

सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग या दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघांनी सिम्बा, सूर्यवंशी या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच रोहित शेट्टी याच्या आगामी सर्कस सिनेमातही या दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : रावणाच्या ऐवजी श्रीरामांचा पुतळा जाळला; कुठे घडला धक्कादायक प्रकार? पाहा व्हिडिओ

Green Coffee: वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Manoj Jarange: मराठा आरक्षण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; मनोज जरांगे नेमकं काय काय म्हणाले? EXCLUSIVE VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार

Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

SCROLL FOR NEXT