Randeep Hooda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Randeep Hooda : 'जाट'मधील रणदीप हुड्डाचा फर्स्ट लूक, व्हिडीओ पाहून चाहते गोंधळात

Jaat Movie : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आता 'जाट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. जो पाहून चाहते चकित झाले आहेत.

Shreya Maskar

'जाट' (Jaat ) हा ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नुकताच एक 'जाट' चित्रपटाच्या झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणदीप हुड्डा 'रणतुंगा' या भूमिकेत दिसत आहेत. जो 'जाट'चा धोकादायक शत्रू आहे. रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda ) लूक आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'जाट' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांना 'जाट'च्या जगाची झलक दाखवून थरार अनुभव दिला होता. चित्रपटातील रणदीप हुड्डाचा लूक समोर आल्यामुळे चाहत्यांना चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने आजवर अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत.

रणदीप हुड्डा यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो आता 'जाट'मधील 'रणतुंगा' या दमदार आणि धोकादायक भूमिकेत प्रेक्षकांना चकित करण्यास सज्ज आहेत. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्समुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायथ्री मूव्ही मेकर्स आणि पीपल मीडिया फॅक्टरी यांच्या या भव्य सहयोगातून बनलेला हा ॲक्शन चित्रपट तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणार आहे.

'जाट' चित्रपटात रणदीप हुड्डासोबत सनी देओल देखील पाहायला मिळणार आहे. चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. तसेच चित्रपटात विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कॅसेंड्रा महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील ॲक्शन दृश्ये अनल अरासु, राम लक्ष्मण आणि वेंकट यांनी अप्रतिम पद्धतीने साकारली आहेत. जी प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. थमन एस यांचे जोशपूर्ण संगीत आणि ऋषी पंजाबी यांची अप्रतिम सिनेमॅटोग्राफी चित्रपटाच्या अनुभवात अधिक भर टाकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

SCROLL FOR NEXT