Sachin Khedekar : २१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर, नाटकाचे नाव काय?

Sachin Khedekar Theatre : मराठी अभिनेता सचिन खेडेकर याने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा २१ वर्षांनी सचिन खेडेकर रंगभूमीवर येणार आहे. त्यांच्या नवीन नाटकाचे नाव जाणून घेऊयात.
Sachin Khedekar Theatre
Sachin KhedekarSAAM TV
Published On

एखादा कलाकार कितीही मोठा झाला आणि त्याला कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. तरी त्या कलाकाराची रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळतो. इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो. प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. याला अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत.

सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ते आता तब्बल 21 वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. "आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक 'भूमिका' येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते..." असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या 'भूमिका' या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत.

अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. आता आगामी 'भूमिका' या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. मात्र त्यांच्या भूमिकेचा खुलासा अद्याप झाला नाही आहे.

Sachin Khedekar Theatre
Holi 2025 Hindi Songs : 'लेट्स प्ले होली...' रंगांची उधळण करत बेभान होऊन नाचा, प्लेलिस्टमध्ये टॉप १० हिंदी गाणी आताच सेव्ह करा

'भूमिका' या नाटकात इतर कोण कलाकार पाहायला मिळणार हे देखील अजून स्पष्ट झाले नाही. 'भूमिका' नाटकाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

Sachin Khedekar Theatre
Imtiaz Ali : शाहिद-करीना एकत्र, 'जब वी मेट २' येणार? इम्तियाज अली म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com