Swatantrya Veer Savarkar Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

घेतला ज्यांनी वसा अखंड भारताचा..., Randeep Hooda च्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा मराठी ट्रेलर रिलीज

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Out: रणदीप हुड्डाच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हिंदी ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा मराठी ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Priya More

Swatantrya Veer Savarkar Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'स्वातंत्रवीर सावरकर' या चित्रपटाची (Swatantrya Veer Savarkar Movie) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने अभिनयासोबत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. रणदीप हुड्डाच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हिंदी ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचा मराठी ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले त्याच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात हा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजण्ड स्टुडिओज, अवाक फिल्म्स आणि रणदीप हुड्डा फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या सहकार्याने प्रदर्शित होणार आहे.

रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचे झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार आणि रणदीप हुड्डा निर्माते असून रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे यांनी सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात ट्रेलरमधील दमदार स्टारकास्ट, उत्तम कथानक, संवाद, दिग्दर्शन पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बायोपिक हुतात्मा दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २२ मार्चला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा प्रवास आणि संघर्ष या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT