Raj Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Kapoor: राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर'च्या यूक्रेनी पोस्टरचा लिलाव, कमाईमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड

Raj Kapoor Mera Naam Joker Movie: राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित खास गोष्टींचा म्हणजेच त्यांचे ऑटोग्राफ, त्यांचे फोटो, फिल्म पोस्टर्ससह अनेक गोष्टींचा लिलाव करण्यात येत आहे.

Priya More

Raj Kapoor Birth Centenary Year:

बॉलीवूडचे (Bollywood) 'मेगास्टार' राज कपूर (Raj Kapoor) हे असे नाव आहे ज्याला ओळखीची काहीच गरज नाही. राज कपूर यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या काळामध्ये फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळवली. आज जरी राज कपूर आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या माध्यमातून ते आज करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहेत. आजही राज कपूर यांचा अनेक देशांमध्ये मोठा चाहतावर्ग आहे.

राज कपूर यांच्या चाहत्यांना आजही त्यांच्याशीसंबंधित आठवणी जपून ठेवायच्या आहेत. नुकताच राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी संबंधित खास गोष्टींचा म्हणजेच त्यांचे ऑटोग्राफ, त्यांचे फोटो, फिल्म पोस्टर्ससह अनेक गोष्टींचा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावामध्ये राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर'च्या यूक्रेनी पोस्टरचा लिलाव करण्यात आला. या पोस्टरच्या कमाईमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

नुकताच राज कपूर यांच्या वस्तूंचा Raj Kapoor@100 वर ऑनलाइन लिलाव करण्यात आला. राज कपूर यांच्या 1960 साली प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय चित्रपट 'बनवारा' च्या पोस्टर आणि 'मेरा नाम जोकर' च्या युक्रेनियन रिलीज पोस्टरचा आतापर्यंतच्या सर्वाधिक किमतीत लिलाव करण्यात आला. 'बनवारा' 5 लाख रुपयांपेक्षा जास्त तर 'मेरा नाम जोकर'चे युक्रेनियन पोस्टर 1.5 लाख रुपयांना विकले गेले. यासोबतच राज कपूर यांनी या जगात नसतानाही अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे पोस्टर मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

ETimesच्या रिपोर्टनुसार लेखक, चित्रपट इतिहासकार एसएमएम असुजा यांनी सांगितले की, पोस्टर पाहण्यास आश्चर्यकारक होते आणि ते फारच दुर्मिळ होते. कारण तो चांगला कमाई करणारा चित्रपट नव्हता. हे एक कारण आहे की यामुळे लोकांमध्ये संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. दुसरी गोष्ट म्हणजे या महान दिग्दर्शकाची शताब्दी सुरू आहे. त्यामुळे या दिवसांत त्यांच्याकडेच अधिक लक्ष आहे. लिलाव सहसा स्पर्धेसह संपतो आणि बरेच लोक या पोस्टरसाठी देखील बोली लावतात. यामुळे त्याची किंमत लाखांपर्यंत पोहोचली असून त्यामुळे एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.

शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राज कपूर यांची 100 वी जयंती सुरू असताना त्यांना याहून चांगली श्रद्धांजली काय असू शकते. राज कपूर यांना जागतिक लोकप्रियता मिळाली. विशेषत: सोव्हिएत युनियनमध्ये, ज्याची सुरुवात 'आवारा'च्या यशाने झाली. यानंतर त्यांचे सर्व चित्रपट परदेशात मोठ्या धूमधडाक्यात प्रदर्शित झाले आणि ते सुपरहिट देखील ठरले. हे दुर्मिळ 'मेरा नाम जोकर' पोस्टर ज्याला विक्रमी किंमत मिळाली. हे मूळ आंतरराष्ट्रीय रिलीज पोस्टर आहे. राज कपूर दिग्दर्शित 'बॉबी' चित्रपटासाठीही अनेकांनी बोली लावली, ऋषी कपूरच्या चाहत्यांनीही या लिलावात उत्साहाने भाग घेतला. चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा 'बॉबी' चित्रपटाला रिलीज होऊन 50 वर्षे पूर्ण होणार आहे. 'बॉबी'चे पोस्टरही 106,400 रुपयांच्या बोलीने विकले गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT