Sohail Khan saamtv
मनोरंजन बातम्या

Sohail Khan Birthday: विमान उडवायचं होतं, पण या कारणामुळे शक्य झालं नाही

सोहेल खानला बॉलिवूडमध्ये न येता आकाशात भरारी घ्यायची होती.

Pooja Dange

Sohail Khan Birthday Special: अभिनेता आणि दिग्दर्शक सोहेल खानचा आज ५२वा वाढदिवस आहे. सोहेल खानला बॉलिवूडमध्ये न येता आकाशात भरारी घ्यायची होती. त्याला पायलट व्हायचे होते. परंतु त्याच्या डोळ्यांच्या त्रासामुळे तो सिलेक्ट झाला नाही. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी.

बॉलिवूडमध्ये सोहेलने त्याच्या कारकिर्दीची सुरूवात दिग्दर्शक म्हणून केली होती. १९९७मध्ये प्रदर्शित झालेला 'औजार' हा चित्रपट सोहेलचा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. २००० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'मैंने दिल तुझको दिया' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील त्याच्या करिअर सुरूवात केली. सोहेलने या चित्रपटामध्ये अभिनयाव्यतिरिक्त कथालेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा केली होती. सोहेलला हिट चित्रपट देता आले नाही. त्यामुळे तो पुन्हा दिग्दर्शनाकडे वळला. (Celebrity)

सोहेल खानने त्याच्या 'जी. एस. एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली 'प्यार किया तो डरना क्या' (१९९८) आणि दोन्ही भावांना घेऊन 'हॅलो ब्रदर' हे चित्रपट बनविले. अभिनेता म्हणून सोहेल खानचा 'मैंने प्यार क्यों किया' हा चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर सोहेलनी 'पार्टनर' आणि 'आर्यन' या चित्रपटांची निर्मिती केली.

सोहेल खान अभिनेता म्हणून फार कमी चित्रपटनमध्ये पाहायला मिळतो. पण तो त्याच्या गुड लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो. अभिनेता म्हणून 'ट्यूबलाईट' या चित्रपटामध्ये तो शेवटचा दिसला होता. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. सोहेलने आतापर्यंत सलमान खानसह पाच चित्रपटनमध्ये काम केले आहे. मैंने प्यार क्यों किया, सलाम-ए-इश्क: ए ट्रिब्यूट टू लव, गॉड तुस्सी ग्रेट हो, वीर आणि ट्यूबलाइट ही त्यांच्या एकत्रित केलेल्या चित्रपटांची नावे आहेत. (Movie)

सोहेल खानचे त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. यावर्षी त्याचा आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांचा घटस्फोट झाला आहे. सोहेल आणि सीमाने घरच्यांना न सांगता आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर मध्यरात्री मौलवींना किडनॅप करून त्यांनी निकाह केला. सोहेल आणि सीमाला निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. सीमा सचदेव फॅशन डिझायनर आहे. 'बांद्रा १९०' नावाचे तिचे बुटीक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

SCROLL FOR NEXT