Kriti Sanon Prabhas Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prabhas: प्रभास लग्न कधी करणार? उत्तर एकूण व्हाल थक्क; नेटकऱ्यांना दिले खास उत्तर...

'बाहुबली' फेम प्रभास गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया बराच चर्चेत होता. त्याची शरीरयष्टी आणि दमदार अभिनयामुळे त्याने मनोरंजनसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहे.

Chetan Bodke

Prabhas: 'बाहुबली' फेम प्रभास गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया बराच चर्चेत होता. त्याची शरीरयष्टी आणि दमदार अभिनयामुळे त्याने मनोरंजनसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटामुळे चर्चेत होताच पण सोबतच त्याच्या अफेयर्सची ही चर्चा सर्वत्र होत आहे. त्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती सेनन सोबत सुत जुळणार असल्याची चर्चा होत होती.

हे दोघेही 'आदिपुरुष' चित्रपटात एकत्र मुख्य भूमिका साकारणार आहेत. प्रभास रावणाच्या भूमिकेत असून सीतेच्या भूमिकेत क्रिती दिसणार आहे. त्यांच्या अफेयर्सची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगत तर होती पण त्या दोघांनीही एकमेकांसोबत असलेल्या नात्यांची ही अफवा आहे, असे सांगत चर्चांना पुर्णविराम दिला. या अनेक गोष्टींच्या खुलास्यांनंतर प्रभासच्या एका बोलण्याने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. प्रभास लग्न कधी करणार? हा प्रश्न विचरला असता त्याने उत्तर ही दिले आहे.

'अनस्टॉपेबल 2' या टॉक शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. प्रभासने त्यावेळी चाहत्यांसमोर त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. नंदामुरीने प्रभासला विचारले की तुझे लग्न कधी होणार ? हा प्रश्न त्यांनी सहज मजेशीरपणे विचारला. यावर प्रभास म्हणतो, 'सलमान खाननंतर' असे उत्तर देत प्रभास जोरजोरात हसायला लागला. त्याचवेळी नंदामुरीसह सर्व प्रेक्षकही या विनोदावर हसायला लागले.

'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभास क्रिती सेननसोबत एकत्र दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रभास आणि क्रिती एकमेकांना डेट करत असल्याची बातमीही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. जेव्हा ही बातमी क्रितीपर्यंत पोहोचली तेव्हा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बातमी खोटी असल्याचे सांगितले.

प्रभासकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. पुढच्या वर्षी त्याचा 'आदिपुरुष' चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये तो क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग या कलाकारांसोबत दिसणार आहे. याशिवाय 'सालार' हा चित्रपटही पुढच्या वर्षी भेटीला येणार असून, त्याचे दिग्दर्शन 'केजीएफ'चे दिग्दर्शकांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT