Paresh Rawal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal : "अक्षय कुमार माझा मित्र नाही...", परेश रावल असं का म्हणाले?

Paresh Rawal-Akshay Kumar Friendship : बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा 'हेरा फेरी 3' चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार (Akshay Kumar ) पाहायला मिळणार आहे. अशात अलिकडेच परेश रावल यांनी अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यामुळे परेश रावल चांगलेच चर्चेत आहेत.

एका मिडिया मुलाखतीत परेश रावल यांनी विचारण्यात आले की, "अक्षय कुमार तुमचा मित्र आहे का?" यावर उत्तर देत परेश रावल "हो" म्हणाले होते. मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "अक्षय कुमार हा मित्र नाही तर सहकलाकार आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहकलाकार, नाटकात मित्र तर शाळेत जिवलग मित्र असतात. अक्षय कुमार हा मोठा अभिनेता आहे. माणूस म्हणून चांगला आहे. मात्र इंडस्ट्रीमध्ये ओम पुरी, नसीरुद्दीन शाह आणि जॉनी लीवर हे माझे चांगले मित्र आहेत. "

परेश रावल यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच सध्या परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या मैत्रीला घेऊन चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र परेश रावल यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

मिडिया मुलाखतीत परेश रावल म्हणाले की, "मी म्हणालो अक्षय कुमार माझा सहकलाकार आहे. माझ्यासाठी मैत्री म्हणजे महिन्यातून किमान ४-५ वेळा मित्रांशी बोलणं असले पाहिजे. आम्ही दोघे कोणत्या पार्टीत एकमेकांना भेटत नाही. पण माझ्या वक्तव्यावर लोकांनी वेगळेच अंदाज बांधले. आम्ही चांगले बोलतो. "

पुढे मुलाखतीत परेश रावल यांनी विचारण्यात आले की, "अक्षय कुमार आणि तुमच्यात काही वाद झाला आहे का? " त्यावर उत्तर देत परेश रावल म्हणाले, "नाही...आमच्यामध्ये काही झालं नाही. आम्ही दोघांनी आजवर १५-२० चित्रपटांमध्ये काम केलं आहे." भुल भूलैया, गोलमाल, वेलकम, दे दना दन यांसारख्या अनेक चित्रपटात परेश रावल आणि अक्षय कुमार या दोघांनी एकत्र काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT