Paresh Rawal Birthday Saam TV
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal Birthday : बँकेतली नोकरी सोडून झाले बॉलिवूडचा 'बाबू भैय्या', बॉसच्याच मुलीच्या प्रेमात पडले होते परेश रावल

Paresh Rawal Struggle Story : उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते परेश रावल यांचा आज ६९वा वाढदिवस आहे.

Chetan Bodke

उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते परेश रावल यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. परेश रावल हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. परेश रावल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी ते विना तिकीट चित्रपट, नाटक पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचे. तब्बल २५०हून अधिक चित्रपट करूनही त्यांची ही आवड आजही कायम आहे. ‘हेरा फेरी’तला ‘बाबू भैय्या’, ‘वेलकम’मधील ‘घुंगरू सेठ’ किंवा ‘हंगामा’मधला राधेश्याम तिवारी असो अशा वेगवेगळ्या भूमिकांमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.

परेश रावल चित्रपटांत काम करण्यापूर्वी ९ ते ५ काम करायचे. परेश रावल यांनी आपल्या करियरची सुरुवात एका बँकेतल्या नोकरीपासून केली होती. मात्र, परेश रावल येथे फार काळ टिकू शकले नाहीत. त्यांनी फक्त तीन दिवसांतच बँकेची नोकरी सोडून दिली आणि त्यानंतर अभिनयालाच आपले करिअर बनवले. परेश रावल यांचा जन्म ३० मे १९५५ रोजी मुंबईत झाला.

१९८२ मध्ये रिलीज झालेल्या 'नसीब नी बलिहारी' या गुजराती चित्रपटातून परेश रावल यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तर १९८४ मध्ये रिलीज झालेल्या, 'होली' चित्रपटातून परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. चित्रपटात त्यांची सहाय्यक अभिनेत्याची भूमिका आहे. त्यानंतर त्यांच्या पदरात एकापेक्षा एक हिट चित्रपटांची रांग लागली. परेश यांनी गुजराती, हिंदी, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९८५ मध्ये राहुल रवैल दिग्दर्शित 'अर्जुन' चित्रपटात परेश यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये, सनी देओलने हिरोची भूमिका तर परेश रावल यांनी खलनायकाची भूमिका साकारली. चित्रपटातल्या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच 'हेरा फेरी' चित्रपटातूनही परेश रावल यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

आपल्या कॉमेडी स्टाइलने लोकांना हसवणारे परेश रावल खासगी आयुष्यात रोमँटिक होते. त्यांची लव्हस्टोरी कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.. परेश रावल स्वरूप संपतच्या प्रेमात पडले होते. स्वरूप संपत ह्या परेश यांच्या बॉसची मुलगी होती. पहिल्याच नजरेत पाहिल्यावर स्वरूप यांच्यासोबत लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, स्वरूप संपत यांना प्रपोज केल्यानंतर वर्षभर ते एकमेकांसोबत बोलत नव्हते.. परेश आणि स्वरूप यांनी एकमेकांना १२ वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी १९८७ मध्ये लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT