Main Atal Hoo 1st Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Main Atal Hoo 1st Day Collection: अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकने पहिल्या दिवशी किती कमावले ?; वाचा सविस्तर

Main Atal Hoo Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या बहुप्रतिक्षित 'मैं अटल हूं' चित्रपटाचे प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींनी आणि समीक्षकांनी कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Main Atal Hoo 1st Day Box Office Collection

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीचा (Pankaj Tripathi) बहुप्रतिक्षित 'मैं अटल हूं' चित्रपट १९ जानेवारीला अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींनी अनेक समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल

भारताचे स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. पंकज त्रिपाठीने चित्रपटामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहे. उत्कृष्ट कथानक, दमदार स्टारकास्ट आणि उत्तम अभिनय अशी सांगड घातलेल्या ह्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटींची कमाई केली आहे.

नुकतंच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरामध्ये बॉक्स ऑफिसवर १ कोटींची कमाई केलेली आहे. स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असं वाटलं होतं. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे चित्रपटाची सुरुवात खूपच संथ झाली.

चित्रपटामध्ये अटलजींचे बालपणीचे दिवस, राजकीय कारकीर्द, बदल घडवून आणण्यासाठी, भारताला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांच्या या चित्रपटात पंकज त्रिपाठींसह अनेक कलाकारांनी काम केले आहे. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओजच्या पाठिंब्याने या चित्रपटाची पटकथा ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिली आहे. तर सलीम-सुलेमान यांनी मनोज मुंतशिर यांनी संगीत दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

SCROLL FOR NEXT