Nawazuddin Siddiqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui: 'चित्रपट फ्लॉप झाला तरी बेहत्तर पण...' नवाजच्या विधानाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले...

नवाजुद्दीन सिद्दीकीला बॉलिवूड क्षेत्रात अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाते.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीला बॉलिवूड क्षेत्रात अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जाते. त्याने वैविध्यपूर्ण, दर्जेदार आशय असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. नवाजने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केल्याने तो उत्कृष्ट अभिनेता असल्याचे नेहमीच प्रेक्षकांच्या नजरेस येतो. प्रत्येक कलाकार आयुष्यात एकदा तरी चित्रपटांतील अपयश अनुभवतात.

प्रेक्षक वर्गाकडून चित्रपट फ्लॉप झाला तर कलाकाराला जबाबदार धरले जाते, अशी खंत यावेळी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने व्यक्त केली आहे. सध्या त्याचा ‘हड्डी’ चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. चित्रपटात त्याची तृतीयपंथीयाची भूमिका असून चित्रपटातील त्याचा लूक सर्वांनाच आवडला आहे.

चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान नवाजुद्दीन म्हणतो, "चित्रपटांची कमाई कशी ही असूदे, पण नवाजुद्दीन सिद्दीकी चालणार. याचं कारण मी कधीही हार मानत नाही, सोबतच मी त्यासाठी मेहनत घ्यायला कधीच लाज बाळगत नाही. आपल्या कामावरुन प्रेक्षक आपले निरिक्षण करतात. चित्रपट फ्लॉप होण्याची अनेक कारणे असतात. पण चित्रपटाचे दिग्दर्शनच जर चाहत्यांना आवडले नाही तर काय फायदा? चित्रपट फ्लॉप झाला तर चाहते कलाकाराला दोष देतात, दिग्दर्शकाला नाही. या अभिनेत्यामुळे चित्रपट फ्लॉप झाला असा ठपकाच प्रेक्षक ठेवतात."

यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटसृष्टीतील एक उदाहरण देत सांगितले, “शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. जर तो चित्रपटात प्रमुख भूमिका करत असेल आणि त्याचा चित्रपट फ्लॉप झाला तर तो दोष त्याचा नाही. कारण त्याने दिग्दर्शकाला त्या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपलब्ध करून दिला होता. पण तरीही जर तो चित्रपट अपयशी झाला, तर याचा अर्थ तो दिग्दर्शकाचा किंवा त्या चित्रपटाच्या कथेचा दोष आहे. पण त्यांच्याकडे कोणीही बोट दाखवत नाही.” नवाजच्या या वाक्याने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...

Airtel Cheapest Plan: एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, वर्षभर सिम राहिल सक्रिय; किंमत किती?

Gold Rate Perdiction : पुढच्या वर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड बनवणार,किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल, बाबा वेंगांची भविष्यवाणी

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

SCROLL FOR NEXT