Nawazuddin Siddiqui Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Nawazuddin Siddiqui Struggle Story : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखत नाही असा व्यक्ती मिळूनही सापडणार नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्याचा सुप्रसिद्ध अभिनेता होण्याचा प्रवास खूप कष्टाचा होता.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखत नाही असा व्यक्ती मिळूनही सापडणार नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्याचा सुप्रसिद्ध अभिनेता होण्याचा प्रवास खूप कष्टाचा होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने स्वबळावर स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे. आज अर्थात १९ मे ला नवाजुद्दिनचा वाढदिवस आहे. त्याने 'गँग्स ऑफ वासेपूर', 'बजरंगी भाईजान', 'किक' आणि 'बदलापूर'सह अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे. आज आपण अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्ट्रगल काळावर भाष्य करणार आहोत.

नवाजुद्दिन सिद्दीकीचा जन्म १९ मे १९७४ रोजी उत्तरप्रदेशातल्या बुढाना येथे झाला आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नवाजने अभिनेता होण्यापूर्वी कधी केमिस्ट तर कधी वॉचमॅनची नोकरी केलेली आहे. तो करियरच्या स्ट्रगलच्या काळात दिवसा मेडिकलमध्ये केमिस्ट म्हणून काम करत होता, रात्री वॉचमॅनची नोकरी करायचा. त्यानंतर त्याने दिल्लीत जाऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश केला. अभिनय शिकल्यानंतर त्याने मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्याने नोकरी शोधली पण, त्याला नोकरी मिळाली नाही. म्हणून अभिनेत्याने चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारायला सुरूवात केली.

१९९९ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटात नवाजने छोटा रोल स्विकारला होता. विशेष म्हणजे आमिरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर नवाजने जवळपास १२ वर्षे छोट्या भूमिका साकारूनच प्रसिद्धी मिळवली. २०१२ हे वर्ष नवाजसाठी स्पेशल ठरलं. या वर्षात त्याचा 'गँग्स ऑफ वासेपुर' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. तेव्हापासून ते आजवर अभिनेता यशाच्या शिखरावर आहे.

तो अनेकदा खासगी आयुष्यात वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. त्याच्यावर लहान भावाच्या बायकोला मारहाण केल्याचा आरोप, एकदा पार्किंगवरुन महिलेसोबत वाद, ऋषी कपूर यांच्यावर वादग्रस्त विधान आणि 'ॲन ऑर्डिनरी लाइफ' पुस्तकामुळे वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटामुळेही तो चांगलाच ट्रोल झाला होता. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून वेबविश्वातही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे.

‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘ठाकरे’, ‘द लंच बॉक्स’, ‘किक’, ‘बदलापूर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘रईस’, ‘मुन्ना मायकल’ सह अनेक दमदार चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. ‘सेक्रेड गेम्स’ वेबसीरिजने नवाजला विशेषला प्रसिद्धी दिली. ‘टिकू वेड्स शेरू’ आणि ‘हड्डी’ त्याच्या ह्या दोन वेबफिल्म्सही ओटीटीवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT