‘सत्यप्रेम की कथा’, ‘भुल भुलैय्या २’ मुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आलेला कार्तिक आर्यन नेहमीच त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. कार्तिक आर्यनचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सध्या अभिनेता ‘चंदु चँपियन’ चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. (Bollywood)
कार्तिक या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत असून, या चित्रपटामध्ये त्याचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे. अभिनेता चित्रपटासाठी तब्बल १४ महिने मराठी भाषा शिकला आहे. कोणतीही भूमिका असो अगदी व्यवस्थित रित्या तो साकारण्याचा प्रयत्न करतो. (Bollywood Actor)
साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी या चित्रपटाची एकत्रित निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान करीत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट या वर्षातला बड्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातून अभिनेता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा अगदी व्यवस्थित रित्या साकारण्यासाठी अभिनेत्याने मनापासून प्रयत्न केलेले आहेत. सुपरस्टार कार्तिकने या चित्रपटासाठी शारीरिकदृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत केली आहे. त्या व्यतिरिक्त कार्तिकने मराठी भाषेसाठीही कमालीची मेहनत घेतलेली आहे. (Kartik Aaryan)
कार्तिकने चित्रपटासाठी १४ महिने विशेष मेहनत घेत मराठी भाषा शिकला आहे. शूटिंगच्या काळात मराठी भाषा शिकवण्यासाठी कार्तिकसोबत प्राध्यापक नेमण्यात आले असून ते पूर्णवेळ कार्तिकसोबतच होते. त्याने मराठी भाषा शिकण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
कार्तिक चित्रपटामध्ये मराठी भाषा कशी बोलतोय, हे पाहण्यासाठी १४ जून २०२४ पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. यासोबतच कार्तिकने चित्रपटामध्ये ऑलम्पिक स्विमिंग चॅम्पियन विरधवल खाडे यांच्याकडून विशेष ट्रेनिंग घेतली आहे. (Bollywood News)
चित्रपटाचे कथानक भारतीय सेनेचे जवान मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मुरलीकांत यांनी १९७० मध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये आणि १९७२ मध्ये जर्मन पॅरालिम्पिक खेळामध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.