Kartik Aaryan rejected pan masala ad worth 9 crore Instagram/@kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan Akshay Kumar: अक्षय कुमारच्या आधी कार्तिक आर्यनला मिळाली होती 'ही' करोडोंची ऑफर

कार्तिक आर्यनने पान मसाला ब्रॅण्डला जाहिरात करण्यास दिला नकार आणि जिंकले चाहत्यांचे मन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी चित्रपटांव्यतिरिक्त जाहिराती सुद्धा करत असतात. सेलिब्रिटी करत असलेल्या जाहिरातींमुळे त्यांना बऱ्याचदा प्रेक्षकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागतो. नुकताच अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या एका जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता, त्याबद्दल त्याने सर्वांची माफीही मागितली. या जाहिरातीबाबत पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

गुटखा कंपनीची जाहिरात करून अक्षय कुमार सोशल मीडियावर (Social Media) खूप ट्रोल झाला होता. अक्षय कुमारच्या आधी त्या जाहिरातीची ऑफर कार्तिक आर्यनला करण्यात आली होती. या जाहिरातीत अक्षयच्या जागी कार्तिक दिसणार होता. त्या बदल्यात त्याला 15 कोटी रुपयेही मिळणार होते, मात्र त्याने क्षणाचाही विलंब न लावता ती जाहिरात नाकारली. कार्तिकशी संबंधित ही बातमी समोर आल्यानंतर, कार्तिकचे चाहते त्याच्यावर खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावर कार्तिकचे चाहते त्याच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

याआधीही कार्तिकला पान मसाला ब्रँडला प्रमोट करण्याची ऑफर मिळाली होती. यासाठी त्याला 8 ते 9 कोटी रुपये मिळणार होते. कार्तिकला युथ आयकॉन म्हणून आपली प्रतिमा मलिन करायची नव्हती किंवा चाहत्यांना चुकीचा संदेशही पाठवायचा नव्हता. यामुळे त्यांनी या ब्रँडला प्रमोट करण्यास नकार दिला.

कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'शेहजादा' या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो 'कॅप्टन इंडिया', 'फ्रेडी' आणि 'सत्यप्रेम'च्या कथेतही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT