Bhool Bhulaiya 3 canva
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiya 3: 'भूल भूलैया ३' चित्रपटाचा ट्रेलर लाँचची तारीख पुढे का गेली? निर्मात्यांनी केले स्पष्ट

Saam Tv

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'भूल भूलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांकडून सोशल मीडियावर चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टार कास्टला घेऊन अनेक गोष्टी पुढे आल्या होत्या. चित्रपटामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे.

'भूल भूलैया ३' चित्रपटाचा ट्रेलर ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु शेवटच्या क्षणी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलरची रिलीज डेट पुढे ढकल्ली आहे. या गोष्टीची घोषमा होताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. निर्मात्यांकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आली नाहीत.

रिपोर्टनुसार, 'भूल भूलैया ३' या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अगदी शेवटच्या क्षणी ट्रेलरमध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकल्याण्यात आली आहे. अनेकांच्या मते कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैया ३' आणि रोहित शेट्टी यांच्या 'सिंघम अगेन' यांच्या ट्रेलरमध्ये क्लॅश होऊ नये म्हणून तारिख पुढे ढकल्याण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर ४:४५ मिनिटांचा असण्याची शक्यता आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ७ सप्टेंबरला लॉंच होणार होता. . 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेलर ठरला आहे. 'भूल भूलैया ३' या चित्रपटाचा ट्रेलर यंदाच्या आठवड्याच्या शेवटी येणार अशी सर्वत्त चर्चा सुरु आहे.

'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या दोन्ही चित्रपटांमुळे येणाऱ्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन होणार आहे. दोन्ही चित्रपट १ नव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 3' या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर तर 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अकोल्यात दोन गटात राडा

Virar Accident : विरारमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने चिरडल्याने २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

VIDEO : आचारसंहितेबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? पाहा समीकरण

Chandrapur News : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणाला विरोध; चंद्रपुरात आदिवासीचा महाआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT