Kartik Aaryan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan : लांब दाढी अन् हातात गिटार, कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3' चित्रपटाच्या सेटवरील VIDEO व्हायरल

Kartik Aaryan Viral Video : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'आशिकी 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशात चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan ) सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'आशिकी 3'मुळे (Aashiqui 3 ) चांगलाच चर्चेत आहे. तो सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यनसोबत 'आशिकी 3'मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) झळकणार आहे. या दोघांची चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. 'आशिकी 3'मध्ये कार्तिक आर्यन रॉकस्टारचे भूमिका साकारणार आहे. अशात आता 'आशिकी 3'च्या सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'आशिकी 3'चे सध्या शूटिंग सिक्कीममधील गंगटोकमध्ये होतं आहे. तेथील शूटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कार्तिकचा वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच व्हिडीओत कार्तिकच्या लूकसोबत त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तो प्रचंड रागात पाहायला मिळत आहे. स्टेजवर कार्तिक व श्रीलीला एकत्र परफॉर्म करत असताना कार्तिक रागाच्या भरात एका व्यक्तीला खूप मारताना दिसत आहे. कार्तिकच्या मागे श्रीलीला दिसत आहे.

'आशिकी 3'चे दिग्दर्शन अनुराग बासू हे करत आहे. 'आशिकी 3' कार्तिक मोठे केस, लांब दाढी अशा लूकमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'आशिकी 3'चित्रपटामुळे सध्या सोशल मीडियावर कार्तिक आर्यन आणि श्रीलीला डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

आशिकी चित्रपट

'आशिकी' चित्रपटाचा आता लवकरच तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आशिकी' चित्रपट 1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'आशिकी 2' 2013ला रिलीज झाला. 'आशिकी 2'ची गाणी चाहत्यांना प्रचंड आवडली. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पाहायला मिळाली. आजही 'आशिकी 2'च्या गाण्यांचे चाहते दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT