Chandu Champion Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chandu Champion Collection : कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची विकेंडमध्ये जोरदार बॅटिंग, सलग दुसऱ्या दिवशी कोटींची कमाई

Chandu Champion Day 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या ‘चंदू चॅम्पियन’ या बायोपिकची तुफान चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दमदार कमाई केली आहे.

Chetan Bodke

सध्या बॉक्स ऑफिसवर पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या ‘चंदू चॅम्पियन’ या बायोपिकची तुफान चर्चा सुरू आहे. या बायोपिकमध्ये, मुरलीकांत यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. ही सर्व किमया दिग्दर्शक कबीर खान यांनी दाखवली असून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कार्तिक आर्यन आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करीत असून चित्रपटाने पहिल्या दिवशी फार उत्तम कमाई केलेली नाही. पण चित्रपटाच्या कमाईमध्ये विकेंडला कमाईत उत्तम वाढ झालेली आहे.

सॅकनिल्क ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनच्या या बहुचर्चित चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत दमदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.७५ कोटी कमावले. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा ११.५० कोटी इतका झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती १२० कोटींमध्ये झालेली आहे.

कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट फक्त देशातच नाही तर जगभरात रिलीज झालेला. जगभरातही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी केली आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT