Jitendra Kapoor-Bharti Singh During TV Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jitendra Kapoor-Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंगच्या 'त्या' कृत्याने जितेंद्र कपूर संतपाले, कारण?

'सा रे ग मा पा लिटिल चॅम्प' दरम्यान भारतीवर संतापले दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर.

Pooja Dange

Jitendra Kapoor-Govinda In TV Shows: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो 'सा रे ग मा पा लिटिल चॅम्प'मध्ये उत्कृष्ट गायक आहेत. कार्यक्रमातील लहान मुलांचे गायन ऐकून सगळेच चकित होतात. या कार्यक्रमाला अनेक दिग्ग्ज हजेरी लावत असतात. कार्यक्रमाच्या या आठवड्यातील भागात सुद्धा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि गोविंदा उपस्थित राहणार आहेत. या भागाचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

झी टीव्हीच्या इन्स्टाग्राम पेजवरील प्रोमोमध्ये जितेंद्र आणि गोविंदा एकत्र दिसत आहेत. तसेच या प्रोमोमध्ये जितेंद्र रागावल्याचे असल्याचे दिसत आहे. तसेच जितेंद्र त्यांची राग कार्यक्रमाची होस्ट भारतीकडे बोलून दाखवत आहेत. जितेंद्र भारतीवरच रागावले आहेत. जितेंद्र रागाच्या भरात भारतील विचारत आहेत की, आमच्या दोघात (गोविंदा आणि जितेंद्रमध्ये) सिनिअर कोण आहे? मी सांगतो. मी सिनिअर आणि गोविंदा ज्युनिअर आहे. मग त्याचे तू पहिलं का घेतलं? (Social Media)

जितेंद्रच्या या प्रश्नाने भारती चांगलीच बिथरलेली दिसत आहे. ती त्यांचे बोलणे अगदी गांभीर्याने ऐकत आहे. प्रोमो व्हिडिओतील पुढच्या शॉटमध्ये भारती जितेंद्र यांच्यासमोर हात जोडून उभी आहे. जितेंद्र यांचे बोलणे ऐकून शोचे परीक्षक देखील गंभीर झाल्याचे दिसत आहे. तर गोविंदा हसत आहे. जितेंद्र खरंच रागावले आहते का? किंवा एखादा प्रॅन्क तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्याला कार्यक्रम पाहावा लागेल. (TV)

प्रोमोच्या सुरूवातीलाचा जितेंद्र आणि गोविंदा स्टेजवर नाचू लागतात. यादरम्यान गोविंदा जितेंद्रच्या प्रसिद्ध गाणे 'नैनो में सपना'वर थिरकताना दिसत आहे. प्रोमोवरून हे स्पष्ट झाले आहे की 'सा रे ग मा पा लिल चॅम्प्स' शोचा या आठवड्यातील भाग धमाकेदार होणार आहे. आता शोमध्ये जितेंद्र यांचा राग आहे का, हेही एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

पुण्यात अग्नितांडव; महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी|VIDEO

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कोणत्या गोष्टी आणल्यास मिळते संपत्ती आणि समृद्धी?

Student Death : सीनियरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील NDA च्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ उकललं?

Belagavi News: रायबागमध्ये घडलं विचित्र; बापानं १९ वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

SCROLL FOR NEXT