hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिकच्या अॅब्सने चाहत्यांना दिला नवा कानमंत्र, आगामी चित्रपटासाठी घेतोय जबरदस्त मेहनत...

सध्या हृतिक 'फायटर' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानचे काही खास फोटो तो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Chetan Bodke

Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकतेच मोठ्या जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले आहे. तो खास नववर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशातून भारतात आला. सोबतच तो नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चाहत्यांच्या पसंदीस उतरत असतात. सध्या तो फायटर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानचे काही खास फोटो तो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याच्या या नव्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तो अभिनयासोबतच त्याच्या शरीरयष्टीमुळेही सर्वत्र चर्चेत असतो. सोमवारी, त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या अॅब्सची काही छायाचित्रे शेअर करून काही चाहत्यांना प्रेरणा दिली. त्याने चाहत्यांना जिममधील लूक दाखवला आहे, त्याने ब्लॅक टी-शर्टवर करत, चाहत्यांना अ‍ॅब्स दाखवले आहे. "ठीक आहे. चला २०२३ मध्ये जाऊया." हृतिक रोशन सध्या दीपिका पदुकोणसोबत 'फायटर' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.

या फोटोत हृतिकने त्याच्या जिममधील लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. त्या फोटोत ब्लॅक टीशर्ट, टोपी आणि ट्रॅक पॅंटमध्ये दिसत असून क्लिन शेव्हमध्ये दिसत आहे. त्याच्या या फोटोवर फक्त चाहत्यांनीच नाही तर अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे, सध्या त्याच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. सोबतच त्याच्या वयावरुनही त्याला काही युजर्स सवाल विचारत आहे. सध्या हृतिकचे वय ४८ असून त्याच्या वयावरुन त्याला बरेच ट्रोल केले जात आहे.

हृतिक आणि दीपिका एकत्र पुढच्या वर्षात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दीपिका सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठानमध्ये मुख्य भूमिकेत असून तिच्यावर अनेक ट्रोलधाड सुरु आहे. हृतिक आणि दीपिका सिद्धार्थच्या आगामी फायटर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, चित्रपट जानेवारी 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अनिल कपूर देखील आहेत. दोन महिन्यांपूर्वी, हृतिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला होता आणि घोषणा केली होती की त्याने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तेव्हापासून हृतिकचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये शिंदे गटाला जबरदस्त झटका, बडे नेते भाजपच्या वाटेवर; प्रमुख पदाधिकारीही कमळ हाती घेणार

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Pune-Solapur : पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Acidity in women: ॲसिडीटी, अपचन समजून ५०% लोकं करतायत 'या' गंभीर समस्येकडे दुर्लक्ष; सर्वाधिक महिला आणि मधुमेहींचा समावेश

Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT