Hrithik Roshan Fighter Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Fighter Movie: हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंदने शेअर केला ‘फायटर’ फोटो, इटलीमध्ये होतेय गाण्याचे शूटिंग

Hrithik Roshan And Siddharth Anand: इटलीमध्ये फायटर चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरु आहे. याच ठिकाणावरून दोघांनी एकत्र असलेला हा फोटो शेअर केला आहे.

Priya More

Fighter Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत हृतिकचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. हृतिक रोशन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद यांनी नुकताच फिल्मी अनिवर्सरीच्या निमित्ताने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इटलीमध्ये फायटर चित्रपटातील गाण्याचे शूटिंग सुरु आहे. याच ठिकाणावरून दोघांनी एकत्र असलेला हा फोटो शेअर केला आहे.

चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद आणि अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांनी त्यांच्या नवीन सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात केली आहे. सध्या 'फायटर'ची टीम इटलीमध्ये गाण्याचे शूट करत आहे. याची एक खास झलक प्रेक्षकांना हृतिकने शेअर केलेल्या फोटोच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे.

हृतिक आणि सिद्धार्थ यांनी यापूर्वी दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'बँग बँग' आणि 'वॉर' या दोन्ही चित्रपटांची अनिवर्सरी सेलिब्रेट करत असताना आता हे दोघं फायटरसाठी एकत्र काम करताना दिसत आहेत. हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे २ ऑक्टोबर २०१४ आणि २ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलीज झाले होते. चित्रपटाच्या अनिवर्सरीनिमित्त या दोघांनी फायटरच्या सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे.

हृतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय. हृतिक रोशनने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या सर्जनशील सहकार्याची १० वर्षे, आज 'बँग बँग' रिलीज होऊन ९ वर्षे पूर्ण झाली आहेत, 'वॉर' रिलीज होऊन ४ वर्षे झाली आहेत आणि आमचा 'फाइटर' क्षितिजावर आहे. त्याची सुरुवात झाली आहे. शिमल्यामध्ये धमाकेदार शूटिंग झाल्यानंतर आता आम्ही निळ्या आकाशात उडण्यासाठी सज्ज आहोत.'

दुसरीकडे सिद्धार्थ आनंदने देखील हाच फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तर ही आमची १० वर्षे आहेत. एकत्र काम करताना आणि एकत्र चित्रपट तयार करताना, #9yearsofbangbang, #4yearsofwar, आणि आता #fighter.' हृतिकच्या इन्स्टा पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. त्याच्या या पोस्टला ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. दरम्यान हृतिकचा फायटर चित्रपट हाय - ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे. या चित्रपटाबाबत त्याचे चाहते खूपच उत्सुत असून ते चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT