Govinda Saamtv
मनोरंजन बातम्या

Govinda Birthday: बापरे! अभिनेता गोविंदाला एकाचवेळी आली होती 70 चित्रपटांची ऑफर, 'या' एका जाहिरातीने बदलले नशिब

या काळात त्याची लोकप्रियता इतकी होती की, एकावेळी त्याला ७० चित्रपटांची ऑफर आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Govinda: गोविंदा हा बॉलिवूडधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.. पाहूया त्याच्या अभिनय कारकिर्दिचा प्रवास.

'हिरो नं वन', 'कुली नं वन', 'पार्टनर' अशा एकापेक्षा एक धमाकेदार भूमिका साकारत अभिनेता गोविंदाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजही त्याच्या या अभिनयाची चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत असते. ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून गोविंदाची ओळख होती. या काळात त्याची लोकप्रियता इतकी होती की, एकावेळी त्याला ७० चित्रपटांची ऑफर आली होती. काय होता हा किस्सा चला जाणून घेवू.

गोविंदाचा (Govinda) जन्म २१ डिसेंबर १९६३ ला मुंबईमध्ये झाला.अभिनेता गोविंदाचे वडील अरुण कुमार अहूजा त्या काळातील लोकप्रिय कलाकार होते. त्यांनी ३०- ४० चित्रपटात कामही केले होते. कॉमर्समध्ये डिग्री पुर्ण केल्यानंतर गोविंदाने अनेक ठिकाणी नोकरीही केली होती. ८० च्या दशकात गोविंदाला एलविन कंपनीची जाहिरात मिळाली आणि त्याचे नशीबच पालटले. यानंतर १९८६ मध्ये गोविंदाने इल्जाम चित्रपटातून पदार्पण केले ज्यानंतर त्याच्या करिअरची गाडी सुसाट सुटली.

गोविंदाची १९८५-८६ च्या काळात प्रचंड लोकप्रियता होती. याच काळात अभिनेता गोविंदाला एकाचवेळी तब्बल ७० चित्रपटांची ऑफर आली होती. याबद्दलचा खुलासा स्वतः गोविंदाने एका मुलाखतीत बोलताना केला होता.

या मुलाखतीत बोलताना गोविंदाने सांगितले की, "मला एकाचवेळी सत्तर चित्रपटांची ऑफर आली होती. हे खरे आहे परंतु त्यामधील अनेक चित्रपट सूरू होण्याआधीच बंद झाले. कारण अनेक चित्रपटांच्या तारखांचा प्रोब्लेम होता. ज्यामुळे त्याला वेळ देता येत नव्हते. इतकेच नव्हेतर या काळात एकाच दिवशी चार- चार चित्रपटाचे शुटिंग करत होता," असेही त्याने सांगितले.

दरम्यान, अभिनेता गोविंदाने ८०-९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. गोविंदाचे 'पार्टनर' 'कुली नं वन' हे चित्रपट प्रचंड गाजले. गोविंदाची आई शास्त्रीय गायिका होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT