Govinda apologizing through a live video, requesting pardon on behalf of wife Sunita Ahuja. saam tv
मनोरंजन बातम्या

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

Actor Govinda Apologizes For Wife Sunita Ahuja: गोविंदाने त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या वतीने लाईव्ह स्ट्रीममध्ये पंडित मुकेश शुक्ल यांची माफी मागितली, ज्यांनी ते अंधश्रद्धाळू असल्याचे आणि पंडितांवर लाखो रुपये खर्च केल्याचे म्हटले होते.

Bharat Jadhav

  • पत्नी सुनीता आहुजा यांच्या वतीने पंडित मुकेश शुक्ला यांची अभिनेता गोविंदानं माफी मागितली.

  • पती गोविंदा अंधश्रद्धेवर खूप खर्च करतो, असे विधान सुनिता आहुजा यांनी केलं होतं.

  • एका व्हिडिओ प्रसारित करत अभिनेता गोविंदा यांनी पंडित मुकेश शुक्ला यांची माफी मागितली.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता गोविंदाने त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वतीने पंडित मुकेश शुक्लांची सार्वजनिक माफी मागितली. एक व्हिडिओ शूट करत अभिनेता गोविंदानं पंडित शुक्ला यांची माफी मागितली. गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या कुटुंबाचे पंडित शुक्ला यांचा उल्लेख करत त्याच्याविषयी काही अपशब्द उच्चारले होते. गोविंदा अंधश्रद्धेवर खूप खर्च करतो असेही त्या म्हणाल्या होत्या.

आता त्यांच्या विधानावरून अभिनेता गोविंदा यांनी माफी मागितली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत गोविंदाने त्याच्या पत्नीच्या वतीने पंडित शुक्ला यांची माफी मागितली आहे. माझ्या पत्नीने तुमच्याबद्दल बोललेल्या अपशब्दांसाठी मी माफी मागतो,असं गोविंदाने लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हटलंय.

पत्नीने वापरलेल्या अपशब्दांसाठी मागितली माफी

गोविंदाने त्यांच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये म्हटलं की, "मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या कुटुंबातील पंडित जी, आदरणीय मुख्य शुक्ला जी, खूप योग्य, प्रामाणिक, खूप प्रतिभावान आहेत आणि उत्तर प्रदेशातील काही निवडक लोकांपैकी एक आहेत. त्यांना यज्ञ पद्धत समजते. आपले वडील आदरणीय जटाधारी जी यांच्याशी आमचं कुटुंबाचे चांगले संबंध आहेत.

माझ्या आदरणीय पत्नीने तुमच्याविरुद्ध अपशब्द वापरले. त्याबद्दल मी माफी मागतो. मीही त्या विधानासह असहमत आहे. त्या वक्तव्याचे ते खंडन करत आहेत. गोविंदा यांनी सांगितले की “पंडित मुकेश जी आणि त्यांचे कुटुंब माझ्या प्रत्येक संकटाच्या काळात माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेत. ते माझ्यासाठी अत्यंत आदरणीय आहेत.” तसेच पत्नीच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल त्यांनी क्षमाप्रार्थना व्यक्त केली. या निवेदनानंतर गोविंदांनी पंडित मुकेश शुक्ला कुटुंबावरील आपला विश्वास आणि आदर पुन्हा अधोरेखित केला.

आपल्या माफीनामाच्या व्हिडिओमध्ये गोविंदा पुढे म्हणाले की, खूप अडीअडचणीच्या काळातून आपण बाहेर आलो आहोत. तुमचे देशभरातील चांगल्या नेत्यांशी चांकगले संबंध आहेत. आणि माझ्यासोबत आहेत. त्यामुळे आम्ही संकटावर सहज मात करू शकलो. ब्राह्मण समाजाची, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची कृपा नेहमीच आमच्यावर राहो ही माझी नम्र प्रार्थना आहे. धन्यवाद असं गोविंदा आपल्या व्हिडिओतून म्हणालय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT