Dream Girl 2 New Teaser Instagram/ @ayushmannk
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2: पुजाला आला थेट 'पठान'चा कॉल, किंग खानच्या खास अंदाजात 'Dream Girl 2'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Dream Girl 2 Teaser Out: आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'च्या सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. चित्रपटात आयुष्मानने पूजा नावाच्या मुलीचे पात्र साकारले होते, आयुष्मानने मुलीच्या आवाजात बोलत तरुणांना चित्रपटात घायाळ केले होते. टीझरच्या माध्यमातून चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा करण्यात आली असून चित्रपटात नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना दिसणार आहे.

आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा हास्यकल्लोळ करणारा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या माध्यमातून आयुष्मानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत आयुष्मान पूजाच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि त्यानंतर त्याला पठाणचा फोन येतो आणि त्यानंतर पूजा परत कधी येणार याची तारीख समजते.

व्हिडिओमध्ये, आयुष्मान पलंगावर पूजा म्हणून बसलेला आणि गुलाबांच्या सुगंधाचा आनंद घेताना दिसत आहे, जेव्हा तिचा फोन वाजतो. तेव्हा ती म्हणते, " मी पूजा बोलते, आपण कोण?" तितक्यात समोरुन आवाज येतो, "पूजा मी पठान." पठानचा आवाज ऐकून पुजा पटकन उभी राहते, आणि म्हणते, "उफ्फ, कसा आहेस माझा पठान?"

त्यानंतर दोघांमध्ये पुढे रोमँटिक मुडमध्ये संभाषण सुरु असते. टीझरमध्ये 'पठान' पुजाला सांगतो की लवकरच त्याचा आगामी 'जवान' चित्रपट येत आहे. तर त्यावर पुजा म्हणते, 'लवकरच मला पण जवानी येत आहे.' त्यानंतर 'पठान' पुजाला विचारतो की, तू कधी पर्यंत येते. त्यावेळी पुजा म्हणते, सातला तुझ्या सोबत. अर्थात, ड्रीम गर्लचा दुसरा भाग ७ जुलैला प्रदर्शित होत आहे. मात्र निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका खास निर्मात्यांनी पद्धतीने जाहीर केली आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

ड्रीम गर्लच्या पहिल्या भागात अभिनेत्री नुसरत भरुचा आयुष्मानसोबत दिसली होती. तर आता अनन्या पांडे दुसऱ्या भागात दिसणार आहे, ज्याची घोषणा आधीच झाली आहे. मात्र, ड्रीम गर्लने लोकांचे भरपूर मनोरंजन केले होते, आता दुसरा भाग आणखी किती मनोरंजन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT