CID Fame Arpit Kapoor: 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारा बॉलिवूड अभिनेता अर्पित कपूर याच्या पत्नीचे चोरीला गेलेलं सोन्याचं गंठण सोलापूर पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढण्यात यश मिळाले आहे. अर्पित एका लग्नासाठी त्याच्या पत्नीसोबत सोलापूरला गेला होता. त्यावेळी त्याच्या पत्नीचं गंठण चोरीला गेलं होतं.
अभिनेता अर्पित कपूर आपल्या मेहुण्याच्या लग्नासाठी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्याची पत्नी मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेली होती. तेव्हा सोन्याचे मंगळसूत्र मेकअप टेबलासमोर ठेवले होते. मेकअप केल्यानंतर अर्पितची पत्नी श्रमिका मंगळसूत्र न घेताच घाई गडबडीत निघून गेली.
मंगळसुत्र विसरल्याची गोष्ट तिला तब्बल दोन तासानंतर आठवली. परत रुममध्ये जाऊन पाहिल्यानंतर मंगळसूत्र तिथे नव्हते. त्यानंतर तिने हरवलेल्या मंगळसूत्राचा शोध घेतला पण ते मिळाले नाही. यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मेकअप करणाऱ्या महिलेवर त्यांचा संशय अधिक बळावला. चौकशीत महिलेने तिनेच दागिने घेतल्याचे कबूल केले. अवघ्या काही तासातच घटनेचा तपास करत पोलिसांनी अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान पोलिसांनी दागिने चोरलेल्या महिलेविरोधात तक्रार द्यायला सांगितले असता अर्पित कपूरने फिर्याद देण्यास नकार दिला होता. महिलेने चूक झाल्याचे मान्य केले आहे. गुन्ह्यामुळे एखाद्याचे करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे आपण तक्रार देत नाही आहेत. मात्र पोलिसांनी ज्या गतीने हा तपास केला ते पाहून आनंद झाल्याची भावना अभिनेता अर्पित कपूर आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे.
अर्पित कपूर 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'सीआयडी' सह त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.