Arshad Warsi canva
मनोरंजन बातम्या

Arshad Warsi Movies: अर्शद वारसीच्या आयुष्यातील पहिला सोलो सुपरहिट चित्रपट, ज्यानं बॉलिवूडचं नाही तर टॉलिवूडही गाजवलं

Arshad Warsi Super Hit Movies: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी त्याच्या कॉमेडी अभिनयासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीत अर्शदने अनेक उत्कृष्ट चित्रपट गाजवले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? अर्शदचे काही असे बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांनी साऊथमध्ये देखील धुमाकूळ घातलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही दिवसांपापूर्वी अर्शद वारसीने ब्लॉकबास्टर चित्रपट (Blockbaster Film)'कल्की 2898' वर केलेल्या टिकेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कल्की 2898' या चित्रपटामध्ये साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने मुख्य भूमिका साकारली आहे. एका पॉडकास्ट मुलाखाती दरम्यान अर्शदने "प्रभास कल्की २८९७ मध्ये जोकर सारखा दिसतोय." अशी टिका केली होती. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेक वाद झाले आणि सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधाण आले. परंतु अर्शदने त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. अर्शदचा आगामी चित्रपट 'वेलकम टू जंगल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहितीनुसार, हा चित्रपट २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे.

अर्शदने त्याच्या दमदार कॉमेडी आणि जबरदस्त अभिनयामुळे लाखो चाहत्यांच्या मनामध्ये वेगळच स्थान निर्माण केले आहे. अर्शदचे असे अनेक चित्रपट गाजवले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलीय. अर्शदने त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये अगदी उत्साहाने त्याचे पात्र साकारलं आहे. त्याच्या आयुष्यातील विस्मर्णीय चित्रपट म्हणजे 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस'(MunnaBhai MBBS). 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस' या चित्रपटामधील सर्किट हे पात्र अर्शदसह अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजलं आहे. त्यानंतर "गोलमाल" मधील त्याच्या कॉमेडीमुळे अनेक प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये खळखळून हसलेत.

अर्शदने त्याच्या प्रत्येक चित्रपटामधील अभिनयामुळे स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्शदच्या दमदार अभिनयामुळे त्याचे नाव बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीमध्ये नेहमी घेतलं जातं. अर्शद त्याच्या सोशल मीडियावर सुद्धा अ‍ॅक्टिव असतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तो चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. अर्शदने काही दिवसांपूर्वी प्रभासच्या 'कल्की २८९८'(Kalki 2898AD) वर भाष्य केलं होतं ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र त्याची चर्चा सुरू होती.

अर्शद वारसीने १९९६मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. परंतु १७ वर्षांनंतर त्याला 'जॉली एलएलबी' या चित्रपटाच्या माध्यमातून अधिक लोकप्रिय झाला. 'जॉली एलएलबी' (Jolly LLB)२०१३मध्ये चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अर्शदने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत चित्रपटामध्ये बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अर्शदचा 'जॉली एलएलबी' हा चित्रपट पहिला सोलो सुपरहिट चित्रपट ठरला होता. 'जॉली एलएलबी'ने जगभरात 48.7 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT