Arbaaz Khan- Shura Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz- Shura Wedding: 15 वर्षांनी लहान शूरा खानसोबत अरबाज खानचा निकाह, वेडिंगचे इनसाइडड फोटो व्हायरल

Arbaaz Khan- Shura Khan: अरबाजच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाज आणि शूरा लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. अरबाज आणि शूरावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Priya More

Arbaaz Khan- Shura Khan Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानच्या लग्नाची (Arbaaz Khan Marriage) गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर अरबाजने त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत २४ डिसेंबर रोजी निकाह केला. अरबाजने कोणताही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने आणि गुपचूप शूरा खानसोबत निकाह केला. महत्वाचे म्हणजे अरबाज खानची बहीण अर्पिता खानच्या घरी हा कार्यक्रम पार पडला. अरबाज आणि शूराच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. अरबाजच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अरबाज आणि शूरा लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. अरबाज आणि शूरावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

५६ वर्षांच्या अरबाज खानने मलायका अरोराला ६ वर्षांपूर्वी घटस्फोट दिला. १९ वर्षांनंतर हे दोघं वेगळे झाले होते. मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. २०१९ मध्ये त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. काही दिवसांपूर्वी अरबाज आणि जॉर्जिया यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अरबाज खान मेकअप आर्टिस्ट शूरा खानच्या प्रेमात पडला. नुकताच त्याने तिच्यासोबत निकाह देखील केला.

अरबाजने त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. अरबाजची बहीण अर्पिताच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला.अरबाज आणि शूरा एकमेकांशी लग्न करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये येत होत्या. मात्र अरबाज आणि त्याच्या कुटुंबीयांना याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. त्यामुळे हे वृत्त खरं आहे की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशामध्ये अरबाजने २४ डिसेंबरला लग्न करत चाहत्यांना आश्चर्यचकीत केले.

अरबाज खान बॉलिवूडचा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तर शूरा खान मेकअप आर्टिस्ट आहे. शूरा आणि अबराज यांचा निकाह अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या घरी पार पडला. अरबाजने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर निकाहचे फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, माझी मैत्रीण आणि मी आजपासून कायमचे एकत्र झालो आहोत. या खास दिवशी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम पाहिजे आहे.'

दरम्यान, अरबाज खान आणि शूरा खानच्या लग्नाला बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सिंगर हर्षदीप कौरने तिचा परफॉर्मन्स दिला. यावेळी तिने अरबाज आणि शूरासोबत काढलेले क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच या लग्नाला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, फराह खान, संजय कपूर, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांनी हजेरी लावली.अरबाजचा मुलगा अरहान खान देखील या लग्नाला आला होता. अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान २१ वर्षांचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT