Anupam kher On Boycott Bollywood Trend
Anupam kher On Boycott Bollywood Trend Twitter/ @AnupamPKher
मनोरंजन बातम्या

Anupam kher On Boycott Bollywood Trend: बॉलिवूडने बॉयकॉट पासून स्वतःचा बचाव कसा करावा? अनुपम खेरने सांगितला जालीम उपाय

Chetan Bodke

Anupam kher On Boycott Bollywood: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. अनुपम खेर यांनी अनेकदा बॉयकॉट चित्रपटावर भाष्य केले. यावेळी बॉलिवूडला त्यांनी या ट्रेंडसाठी रामबाण उपाय देखील सांगितला आहे. नेहमीच अनुपम खेर सामाजिक विषयांवर आपले परखड मत मांडत असतात.

अनुपम खेर यांनी नुकतेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी चित्रपटांवर टाकण्यात येणाऱ्या बहिष्काराबद्दल भाष्य केले, तुमचा चित्रपट जर नक्कीच उत्तम दर्जाचा असेल तर, तुमचा चित्रपट नक्कीच चांगली कमाई करेल. बॉयकॉट ट्रेंडचा चांगल्या चित्रपटांवर काहीही परिणाम होत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि आपला दृष्टिकोन ठेवण्याचा अधिकार आहे, पण त्यानंतरची परिस्थितीही लक्षात घ्यायला हवी.

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटावरही अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली, अमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट खरंच वाईट चित्रपट होता. पण आमिर खान प्रमुख भूमिकेत असणारा पीके चित्रपट हा खरोखरच चांगला चित्रपट होता. म्हणूनच जोपर्यंत तुमचा चित्रपट चांगला आहे तोपर्यंत तुमचा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडचा बळी होऊ शकत नाही. हा ट्रेंड संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय करणे.

नुकतेच अनुपम खेर यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला सात श्रेणींमध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, मात्र या चित्रपटाला कोणत्याही श्रेणीत पुरस्कार मिळालेला नाही.

चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. काश्मिर फाईल्सला एकही पुरस्कार नाही हे पाहून वाईट वाटले. अशी प्रतिक्रिया खेर यांनी दिली होती.

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अनुपम खेर लवकरच कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहेत. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सध्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे, चित्रपटाचे सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

Rahul Gandhi: सत्तेत आल्यास 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार, आरक्षणावर राहुल गांधींची मोठी घोषणा

Today's Marathi News Live: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT