Anil Kapoor Statment In Koffe With Karan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor On Kangana Ranaut: अनिल कपूरने केला धक्कादायक खुलासा, कंगनासाठी सोडणार होता पत्नीला

Anil Kapoor Statment Viral: सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण’ शोमधील एक जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अनिलला त्याच्या पत्नीसंबंधित विचारलेला प्रश्न तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Anil Kapoor Statment In Koffe With Karan: बॉलिवूड चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित शो ‘कॉफी विथ करण’ ची नेहमीच चर्चा होते. या शो मध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर त्याच्या शोमधील एक जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या शोमध्ये बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरने हजेरी लावली होती. यावेळी करणने अनिल कपूरला एक प्रश्न विचारला होता.

सध्या हा प्रश्न कमालीचा चर्चेत आला आहे. जर कोणत्याही महिलेसाठी तुला पत्नी सुनिताला सोडावे लागले तर, ती महिला कोण असेल? असा प्रश्न करणने अनिल कपूरला विचारला होता. सध्या कॉफी विथ करण ८ (Koffee With Karan 8) ची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

शो मधील अनेक जुने किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. करण जोहरच्या शोमध्ये अनिल कपूर आणि संजय दत्त पोहोचले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत कंगना रणौत देखील उपस्थित होती. शोमध्ये करण जोहरने कंगनाला प्रश्न केला. तो म्हणतो, ‘तु स्वतःवर कधी काम करते का?’ यावर कंगनाने ‘होय’ उत्तर दिलं. पुढे करण जोहर म्हणतो, ‘मला वेगळ्या प्रकारे म्हणायचे आहे.’ कंगना लाजते आणि म्हणते, ‘तुला काय जाणून घ्यायचे आहे ते थेट बोलशील का?’ मग त्याने कंगनाला प्लास्टिक सर्जरीबद्दल प्रश्न विचारला.

करणने विचारलेल्या प्रश्नावर कंगानाने उत्तर दिले की, ‘मी हे केले नाही, कारण मी तरुण आहे आणि उत्तर भारतातील मुलींना सौंदर्याकरिता त्यांच्यावर आशीर्वाद आहे.’ नंतर करणने अनिल कपूरला प्रश्न विचारला,‘जर तुला तुझ्या पत्नीऐवजी दुसरी कोणतीही स्त्री निवडायची असेल, तर तु कोणाला निवडेल?’ इथे हॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीचं नाव घेण्याची परवानगी नाही, असेही करण म्हणाला. या प्रश्नाचे उत्तर अनिलने लगेच दिले. अनिल कपूर म्हणाला, ‘मग ती कंगना रणौत असेल.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘म्हणूनच कंगना अनिलचा एवढा तिरस्कार करते, यात नवल नाही, या गोष्टी वर्षानुवर्षे अशाच जमा झाल्या आहेत.’ अनिल कपूरचं हे उत्तर मात्र चाहत्यांना काही आवडलेलं नाही, असंच दिसतय. तर आणखी एक युजर म्हणतो, ‘मला कंगना आवडत नाही, पण मला ती आधी खूप आवडायची.’ तर आणखी एक म्हणतो, ‘असे विचित्र प्रश्न विचारून तिला बाजूला सारल्यासारखे वाटले. ती बॉलीवूडमधील सर्वात संतप्त अभिनेत्रींपैकी एक का बनली आहे, हे आता कळतंय.’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

10 लाख द्या तरच तक्रार मागे घेतो! स्पर्धा परीक्षा क्लास चालकांना खंडणीचा फोन; पुण्यात नेमकं काय घडलं?

अतिक्रमण वाचवण्यासाठी फोन केलात तर... थेट नावच फलकावर! पुणे आयुक्तांचा मास्टरस्ट्रोक

SCROLL FOR NEXT