Anil Kapoor Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor Birthday: दुबईत अपार्टमेंट अन् लग्जरी कार, 'मिस्टर इंडिया' किती कोटींचे मालक?

Anil Kapoor Net Worth: आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारा अभिनेता अनिल कपूर आज ६८ वर्षांचा झाला आहे. तो आजही दमदार चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याचे नेटवर्थ जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) त्याच्या डॅशिंग शैलीसाठी ओळखला जातो. त्याने 80चे दशक गाजवले आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. आताही अनिल कपूर फायटर, ॲनिमल सारख्या ॲक्शन चित्रपटामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. अनिल कपूर एक लग्जरी लाइफस्टाइल जगत आहे. आज अभिनेता अनिल कपूरचा ६८ वाढदिवस आहे.

अनिल कपूर नेटवर्थ

अनिल कपूर आपल्या जबरदस्त चित्रपटातून बंपर कमाई करत आहे. तसेच तो एक निर्माता देखील आहे. तो 'बधाई हो बधाई' या 2002 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा निर्माता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता अनिल कपूर यांची एकूण संपत्ती (Net Worth) 134 कोटी रुपये आहे. अनिल कपूर वर्षाला 12 कोटी रुपये कमावतात. तसेच अनिल कपूर एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेतात.

अनिल कपूर याचे अनेक ब्रँडसोबत कनेक्शन आहे. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी तो साधारण 55 लाख रुपये घेतो. अनिल कपूरचा मुंबईतील जुहूमध्ये 30 कोटी रुपयांचा बंगला आहे. हा बंगला 3 मजल्यांचा आहे. तसेच दुबईत दोन बेडरूमचे अपार्टमेंटही आहे. याशिवाय अमेरिकेत एक आलिशान अपार्टमेंट आहे.

अनिल कपूरला आलिशान कार खूप आवडतात. त्याच्याकडे भन्नाट कारचे कलेक्शन आहे. यात बीएमडब्ल्यू, लेम्बोर्गिनी गैलार्डो, स्पायडर, जग्वार, ऑडी आणि मर्सिडीज अशा कोटी रुपयांच्या गाड्या त्याच्याकडे आहे. अनिल कपूरच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते आतुर आहेत. आज वाढदिवसानिमित्त अनिल कपूरने त्याचा आगामी चित्रपट 'सुभेदार'चा टीझर रिलीज केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT