Sunil Shroff Passed Away Saam tv
मनोरंजन बातम्या

Sunil Shroff Passed Away: बॉलिवूडला आणखी एक धक्का, 'ओह माय गॉड 2' फेम अभिनेत्याचं निधन

Oh My God 2 Movie: 'ओह माय गॉड 2' या चित्रपटामध्ये त्यांनी 'खिलाडी' अक्षय कुमारसोबत काम केले होते.

Priya More

Bollywood Actor Sunil Shroff:

बॉलिवूडला (Bollywood) एकापोठापाठ एक धक्के बसत आहे. गुरुवारी बॉलिवूड अभिनेता रिओ कपाडिया (Actor Rio Kapadia) यांचे निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोवर बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. 'ओह माय गॉड 2' फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन झाले (Sunil Shroff Passed Away) आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनील श्रॉफ हे आजारी होते. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'ओह माय गॉड 2' या चित्रपटामध्ये त्यांनी 'खिलाडी' अक्षय कुमारसोबत काम केले होते.

सुनील श्रॉफ यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यांनी दिवाना, द्रोह काल, अंधा युद्ध, तथास्तु यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळं स्थान निर्माण केले होते. त्यांचा सिनेसृष्टीपर्यंचा प्रवास खूपच खडतर होता.

सुनील श्रॉफ यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट होते. ते सोशल मीडियावर सक्रीय देखील असायचे. इन्स्टावर ते नेहमी पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहायचे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत फोटो शेअर केला होता. ते नेहमी आपल्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत इन्स्टा पोस्ट करत चाहत्यांना माहिती द्यायचे.

सुनील श्रॉफ यांनी फक्च चित्रपटच नाही तर अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट १७ ऑगस्ट २०२२ ला शेअर केली होती. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते ईदवर आधारित सलमान खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

SCROLL FOR NEXT