Akshay Kumr Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumr: मतदानला आलेल्या अक्षयला आजोबांनी थेट रस्त्यातचं अडवलं, काढला टॉयलेटचा विषय, म्हणाले...

Akshay Kumr: सोशल मीडियावर अक्षयने मतदान केल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.

Manasvi Choudhary

आज विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरू आहे. बॉलिवूड कलाकारांनी देखील सकाळपासून मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मतदान केले आहे.

अक्षय कुमारने सकाळी ७.३० च्या सुमारास मतदान केले आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटी मतदान म्हणून अक्षय कुमारला स्पॉट करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर अक्षय कुमार पोहोचताच तेथे सर्वाची एकच गर्दी झाली. सोशल मीडियावर अक्षयने मतदान केल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत.

मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अक्षयने माध्यमांशी देखील संवाद साधला आहे. यावेळी अक्षयने मतदान केंद्रावरती करण्यात आलेल्या व्यवस्थेचं कौतुक केलं आहे. अनेक नागरिकांशी अक्षयने संवाद साधलाय. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर एका वृद्ध व्यक्तीने अक्षयशी संवाद साधला आहे याचदरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा अक्षयशी बोलताना दिसत आहे. अक्षयने देखील आजोबांना हात मिळवताना दिसतोय. पुढे अक्षय आजोबांचे बोलणं ऐकून घेतोय. आजोबा आणि अक्षय यांच्यामध्ये टॉयलेटसंदर्भात बोलणं सुरू आहे.

दरम्यान, आजोबा अक्षयला म्हणाले की, "तुम्ही बांधून दिलेले टॉयलेट आता सडलेले आहे. मी ३ ते ४ वर्षापासून या बाथरूमची अवस्था पाहत आहे. आम्हाला आता त्याची दुरूस्थी करून द्या. यावर अक्षय म्हणतो की मी यासंदर्भात बीएमसीशी बोलतो. पुढे आजोबा बोलतात हे लोखंडाचं आहे त्यामुळे ते रोज सडतं. रोज पैसे टाकावे लागतात. दरम्यान अक्षय म्हणतो ठिक आहे, मी बोलतो त्यांच्यासोबत. हे बीएमसीचं काम आहे.

तुम्हाला फक्त डब्बा द्यायचा आहे तो मी लावून घेतो असं आजोबा म्हणतात, पुढे अक्षय त्यांना नीट समजवताना दिसतोय की यावर बीएसीचं लक्ष देईन पुढे आजोबा म्हणाले की, बीएमसी यात काहीच लक्ष देत नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai food: गरम चहा आणि बन मस्का....! मुंबईतील सुप्रसिद्ध इराणी कॅफेंना एकदा भेट द्याच

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Bollywood Actress: एकेकाळी पेट्रोल पंपावर कॉफी विकून ३० रुपये कमावले, आज आहे २०० कोटींची मालकीण

Maharashtra Politics: तानाजी सावंतांवर अजित पवारांचा पलटवार; म्हणाले “विनाशकाले विपरीत बुद्धी”|VIDEO

Bhakri Tips: आगरी स्टाईल भाकऱ्या जमतच नाही? शेकताच कडक होते? १ सोपी टीप, मिनिटात भाकरी तयार

SCROLL FOR NEXT