Akshay Kumar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सीक्वल येणार? अभिनेत्याने स्वतः दिली हिंट, म्हणाला...

Kesari Part 2 Update : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. आता या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. याबाबत अक्षय कुमारने एक हिंट दिली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार कायम त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाने त्याने चाहत्यांना वेड लावले आहे. त्याचा 'केसरी' हा चित्रपट खूप गाजला. प्रेक्षकांनी याला खूप पसंती देखील दिली. 'केसरी' (Kesari ) हा चित्रपट 21 मार्च 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) मख्य भूमिकेत परिणीती चोप्रा देखील पाहायला मिळाली. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 'केसरी' चित्रपटाला आता 6 वर्ष पूर्ण झाली आहे. याची खास पोस्ट अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तसेच त्याने 'केसरी'च्या 6 वर्षानंतर चित्रपटाचा सीक्वल लवकरच भेटीला येणार असल्याची हिंट दिली आहे.

अक्षय कुमारने पोस्टमध्ये 'केसरी'चा एक खास व्हिडीओ शेअर केला असून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "केसरीच्या यशाची ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. केसरी भावना आणि शौर्याची कहाणी आहे. लवकरच नवीन अध्यायाला सुरूवात करत आहोत."

अक्षय कुमारच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच 'केसरी'चा सीक्वल येणार असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते 'केसरी'च्या सीक्वलसाठ खूप आतुर आहेत. मात्र याबाबात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र अक्षय कुमार नक्कीच काही तरी धमाका करणार असल्याचे या पोस्टवर समजत आहे.

'केसरी' चित्रपटात भरपूर ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'केसरी' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंहने केले आहे. चित्रपटात अक्षय कुमारने ईशर सिंह यांची भूमिका साकारली आहे. 'केसरी' चित्रपट पाहताना अश्रू नक्कीच अनावर होतात. भावना आणि शौर्याची कहाणी यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

SCROLL FOR NEXT