Akshay Kumar visits Haji Ali Dargah Donates Money Ror Renovation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Donates For Haji Ali : खिलाडी अक्षय कुमारची हाजी अली दर्ग्याला कोट्यवधींची देणगी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Akshay Kumar visits Haji Ali Dargah Donates Money Ror Renovation : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेला होता. यावेळी अभिनेत्याने दर्ग्याला चादर देत त्याने पैशांचेही दान दिले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या काही वर्षांपासून अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. त्यासोबतच त्याला अभिनयामुळेही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयचा बॉक्स ऑफिसवर ‘सरफिरा’ चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामुळे अक्षयच्या अभिनय कौशल्याचे कौतुक तर झाले पण चित्रपटाला प्रेक्षकांनी म्हणावा प्रतिसाद दिला नाही. आता या चित्रपटानंतर अक्षय त्याच्या मोठेपणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात दर्शनासाठी गेला होता. यावेळी अभिनेत्याने दर्ग्याला चादर देत त्याने पैशांचेही दान दिले आहे.

अक्षय अभिनयामुळे जरीही ट्रोल होत असला तरीही त्याच्या सामाजिक कार्याचे कायमच कौतुक होते. अक्षय अनेक देवस्थानांमध्ये पैशांची मदत करत असतो. अभिनेत्याने अयोध्येतल्या राम मंदिरासाठी कोट्यवधीची देणगी दिली होती. आता त्यानंतर त्यानं मुंबईतल्या हाजी अली दर्गा ट्रस्टला देणगी दिल्याचं समोर आलंय. अभिनेत्याने १.२१ कोटी रुपये दान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने दर्ग्याच्या नुतनीकरणची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठीच त्याने ही देणगी दिली आहे. याशिवाय अभिनेत्याने हाजी अली दर्ग्याला भेट देत दर्ग्यावर चादरही चढवली.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षयचा २०२४ मधील तिसरा चित्रपट रिलीज होणार आहे. अभिनेत्याच्या तिसऱ्या चित्रपटाचं नाव ‘खेल खेल में’ असं आहे. यापूर्वी अक्षयचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सरफिरा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. पण त्या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी खास प्रतिसाद दिला नाही.

स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणाऱ्या ‘खेल खेल में’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क व फरदीन खान यांसारखे कलाकार आहेत. ‘खेल खेल में’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय, याच दिवशी बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर- राजकुमार रावचा ‘स्त्री २’ व जॉन अब्राहम- शर्वरी वाघचा ‘वेदा’ देखील रिलीज होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT