Akshay Kumar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar : परेश रावल यांच्या हातात मांजा अन् अक्षयची पतंगबाजी; सेलिब्रिटी घेत आहेत मकर संक्रांतीचा आनंद, पाहा VIDEO

Akshay Kumar Makar Sankranti Celebration : मकर संक्रांतीला पतंग उत्सवाला मोठे महत्त्व असते. बॉलिवूडचे कलाकारमंडळी देखील पतंगबाजीचा मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.

Shreya Maskar

आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) नेहमी आपल्या उत्तम अभिनय आणि जीवनशैलीसाठी ओळखला जातो. सध्या संपूर्ण देशभरात मकर संक्रांतीचा मोठा उत्सव पाहायला मिळत आहे. आजही आकाशात उंच पतंग उडवताना मुलं पाहायला मिळत आहे. पतंग उडवायला कोणालाही नाही आवडणार. या पतंगबाजीचा आनंद बॉलिवूडचे कलाकारही घेताना पाहायला मिळत आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर मकर संक्रांतीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अक्षय कुमार पतंगबाजी करताना पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारने अभिनेते परेश रावल यांच्यासोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला आहे. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छतावर उभे राहून अक्षय पतंग उडवत आहे. तर मागे परेश रावल (Paresh Rawal ) यांच्या हातात मांजा पाहायला मिळत आहे. दोघेही पतंगबाजीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आता लवकरच 'भूत बंगला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भूत बंगला' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अक्षय कुमारने हा पतंगबाजीचा आनंद 'भूत बंगला' चित्रपटाच्या सेटवरून घेतला आहे. अक्षयच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच ते चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारने या व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे.

अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझ्या प्रिय मित्र परेश रावलसोबत 'भूत बंगला'च्या सेटवर मकरसंक्रांतीचा उत्साह साजरा करत आहे...हसत राहा...चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या...आणि पतंगाप्रमाणे आकाशात उंच उडा...पोंगल, उत्तरायण आणि बिहूच्या शुभेच्छा..." 'भूत बंगला' हा चित्रपट 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT