Akshay Kumar Movie canva
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Movie : अक्षय कुमारसाठी 'हा' बायोपिक चित्रपट ठरणार संजीवनी; नव्या अपडेटनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Akshay Kumar's New Movie: सुप्रसिद्ध ठरलेल्या 'स्त्री २' चित्रपटामध्ये आपल्या ग्रँड एन्ट्रीने प्रेक्षकांचं लक्षवेधून घेणाऱ्या अक्षय कुमारने अणखी एक बातमीने सर्वांचं लक्ष वेधलंय. अक्षय कुमार एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमरसोबत अनन्या पांडे आणि आर माधवन दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय कुमार सध्या त्याच्या 'स्त्री २' मधील अभिनयामुळे चर्चेत आहे. 'स्त्री २' सध्या बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घालताना दिसतोय. 'स्त्री २' चित्रपटामध्ये अक्षयच्या कॅमिऑची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'स्त्री २'मधील अक्षयच्या अभिनयाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करत आहेत. २०२४मध्ये अक्षय कुमारचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'खेल खेल मै' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे अक्षयला चाहत्यांकडून ट्रोल केलं जात होतं. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या स्त्री २ चित्रपट अक्षयसाठी संजीवनी देणारा ठरला. या चित्रपटातील अभिनयानंतर प्रेक्षक त्याला दाद देत आहेत. या दरम्यान अक्षयने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.मी़डिया रिपोर्टनुसार, अक्षयचा 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धर्मा प्रोडक्शनकडून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अक्षयचा नवा चित्रपट 'सी शंकरन नायर' यांचा बायोपिक असणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगन याचा 'मैदान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची जादू चालली नाही. उत्तम कथा अस्तानाही प्रेक्षकांनी या चित्रपचाकडे पाट फिरवली होती. त्यामुळे अक्षय कुमारचा बायोपिक प्रेक्षकांना कीती भावेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या चित्रपटाची कथा जालिनवाला बाग येथे घडलेल्या हत्याकांडावर आधारित असणार आहे. जालिनवाला बाग येथे स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा नेमकं कश्या पद्धतीनं दिला हे या चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांना कळणार आहे. चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि अनन्या पांडे यांनी वकिलांची भूमिका साकारली आहे. अक्षय आणि अनन्यासोबत या चित्रपटामध्ये आर माधवन याचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.

'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' या चित्रपटामध्ये अक्षयने एका ज्येष्ठ वकिलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा 'द केस दॅट शुक द एम्पायर' या पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक शंकरन नायर यांचे नातू रघु पालट यांनी लिहिले आहे. शंकरन नायर हे पेशाने मद्रास उच्च न्यायालयात वकील आणि न्यायाधीश होते. शंकरन नायर यांनी १८९७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT