Ajay Devgan Viral Video Instagram/ @ajaydevgn
मनोरंजन बातम्या

Ajay Devgan: अजयने भर गर्दीत विनाहेल्मेट चालवली गाडी, चाहत्यांची त्याच्या पाठी एकच धुम

'दृश्यम 2' हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आपली जादू कायम दाखवत आहे. चित्रपटाच्या यशाचा आनंद द्विगुणित करत अजयने आपल्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे.

Chetan Bodke

Ajay Devgan: अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'दृश्यम 2' (Drishyam 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस गल्ला जमवला आहे. हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आपली जादू कायम दाखवत आहे. चित्रपटाच्या यशाचा आनंद द्विगुणित करत अजयने आपल्या नव्या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे. अजयने नुकतेच 'भोला' चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा केला आहे.

अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये अजय वेगाने स्कूटी चालवत आहे आणि त्याच्या चाहत्यांचा जमाव त्याच्या मागे पळत असल्याचे दिसत आहे.अजयचा 'भोला' हा चित्रपट साऊथच्या 'कैथी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. दाक्षिणात्य चित्रपटात कार्तीने मुख्य भूमिका साकारली होती.

या हिंदी रिमेक चित्रपटामध्ये अजय मुख्य भूमिकेत असून तो एका शिवभक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयने शूटिंगच्या वेळी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो गर्दीच्या मध्यभागी विना हेल्मेट स्कूटी चालवताना दिसत आहे. त्याचवेळी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी गर्दीही त्यांच्या मागे धावत आहे.

अजयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये अजय हेल्मेटशिवाय दिसत असल्याने त्याने कमेंट सेक्शनमध्ये लोकांना याबाबत सावध केले आहे.

अजयने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'जेव्हा गर्दी एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्हाला फॉलो करते तेव्हा ते खूप चांगले असते. सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करा. व्हिडिओमध्ये मी हेल्मेटशिवाय दिसत आहे कारण मी शूटिंगचा एक भाग होतो. गाडी चालवताना नेहमी हेल्मेट घाला." असेही व्हिडिओमध्ये खाली लिहिले आहे.

अजय'भोला'चे शूटिंग आवरुन'सिंघम'च्या पुढील भागाच्या शुटिंगसाठी लगेचच जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT