Aashim Gulati - Taj: Divided by Blood Instagram/ @aashimgulati
मनोरंजन बातम्या

अनेक अपयश, पण जिद्द हरला नाही पठ्ठ्या...; आशिम गुलाटी Taj: Divided by Blood मधील भूमिकेने चर्चेत

'ताज: डिवाइड बाय ब्लड' या वेब सीरिजमध्ये दिसणारा आशिम गुलाटी सिनेसृष्टीत फारशी छाप पाडू शकला नाही, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो प्रेक्षकांमध्ये खूप ओळखला गेला.

Chetan Bodke

Aashim Gulati News: किलर लूक, डॅशिंग व्यक्तिमत्व, स्मित हास्य, फॅशनचा हटके अंदाज, साजेशी ड्रेसिंग आणि सडपातळ शरीर या अशा अनेक शब्दांनी अभिनेत्याची ओळख सांगितली जाते. 'ताज: डिवाइड बाय ब्लड' या वेब सीरिजमध्ये दिसणारा आशिम गुलाटी सिनेसृष्टीत फारशी छाप पाडू शकला नाही, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो प्रेक्षकांमध्ये खूप ओळखला गेला. लवकरच आशिम 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड'या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टेलिव्हिजन, सिनेमा आणि ओटीटीवर पुर्वी मिळालेल्या अपयशानंतर आता पुन्हा एकदा आशिम एका नव्या कोऱ्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशिम आता 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड'या वेबसीरिजमध्ये दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम करताना दिसत असून त्यांच्याकडून सर्वांच्याच अपेक्षा फार वाढल्या आहेत. 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' ही वेबसीरिज ३ मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

आशिम गुलाटीसोबत वेबसीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह, धर्मेंद्र आणि अदिती राव हैदरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आशिमच्या भूमिकेबद्दल बोलायचे तर, त्याला प्रमुख भूमिका साकारायला मिळाली आहे.यावेळी प्रेक्षकांच्या मनात आपली व्यक्तिरेखा आणि ओळख निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होईल हे नक्की. आशिमचे सोशल मीडियावर एक लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत, मात्र वेब सीरिजनंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

आशिम गुलाटीच्या सिनेसृष्टीतील प्रवास...

दिल्लीत जन्मलेल्या आशिमचा सिनेसृष्टीतील पहिले दिवस फार खडतर गेले. आशिमने एका मुलाखतीत सांगितले की, अनेक वर्षे रिजेक्शन मिळाल्यानंतर इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागतो हे मानत फार संघर्ष केला. आजही आशिमला काही चित्रपटांसाठी नकार मिळतो, पण तो त्यांना सकारात्मकतेने घेतो.

'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' ची स्क्रिप्ट मिळाल्यावर ते ऐकताच त्यांनी होकार दर्शवला. आशिमने 2015 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. ती मालिका 'गुलमोहर ग्रँड'. ही मालिका अनेकांना ठाऊक नव्हती. तो 'नील गुजराल'च्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला होता.

मालिकेनंतर आशिमने चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. 'तुम बिन 2' मध्ये तो अजरामर होत प्रेक्षकांसमोर आला. आशिमने अभिनेत्री नेहा शर्मासोबत चित्रपटात पदार्पण केले, तरीही चाहत्यांमध्ये आपले स्थान निर्माण करता आले नाही.

सोबतच 'ये है आशिकी' या चित्रपटात काम केले असून त्या चित्रपटानेही आपली जादू दाखवण्यास कुठे तरी कमी पडला. चित्रपटात अपयश मिळाल्याने स्टार प्लसवर 'दिल संभाल जा जरा' या मालिकेतून त्याने पुन्हा एकदा आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला, पण तो ही अपयशी ठरला.

आशिमने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून पराभव स्वीकारला. हळूहळू अनेक सेलिब्रिटी ओटीटीकडे वळू लागले. पण तिथेही त्याला फारसे मिळाले नाही. 2020 मध्ये तो 'होस्टेज'मध्ये दिसला होता. आता आशिम दमदार कलाकारांसोबत दिसणार असल्याने त्याच्या कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहे. 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' ही वेबसीरिज ३ मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT