Rakul Preet Tied Knot With Jackky Bhagnani Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakul Preet-Jackky Bhagnani Wedding: जॅकी भगनानीची बायको झाली रकुल प्रीत, शीख आणि हिंदू पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

Rakul Preet Tied Knot With Jackky Bhagnani: चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल आज लग्नबंधनात अडकले. शीख आणि हिंदु अशा दोन्ही रिती-रिवाजाप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. जवळचे मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

Priya More

Rakul Preet-Jackky Bhagnani:

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) विवाहबंधनात अडकले. गोव्यामध्ये आज म्हणजेच २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा पार पडला. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल आज लग्नबंधनात अडकले. शीख आणि हिंदु अशा दोन्ही रिती-रिवाजाप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. जवळचे मित्र परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी आधी शीख पद्धतीने लग्न केले. त्यानंतर या कपलने हिंदू रिती-रिवाजानुसार देखील लग्न केले. दोन पद्धतीने या कपला विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नानंतर मीडियासमोर येत या कपलने फोटोंसाठी पोझ दिल्या. यावेळी पापाराझींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कपलचा प्री-व्हेडिंग फंक्शन १९ फेब्रुवारीपासूनच सुरू झाले होते. लग्नासाठी गोव्यामध्ये येण्यापूर्वी या कपलने मुंबईतल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर आज हे कपल एकमेकांचे झाले. गोव्यामध्ये शाहीथाटामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. मंगळवार संध्याकाळी रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांची संगीत आणि मेहंदी सिरेमनी पार पडली. या कपलच्या संगीत सिरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रकुल-जॅकीच्या संगीत सिरेमनीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी जबरदस्त डान्स केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या लग्नसोहळ्यामध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, अर्जून कपूर, वरुण धवन-नताशा दलाल, शाहिद कपूर- मीरा राजपूत, आयुष्मान खुराना- ताहिरा कश्यप, अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूर, भूमी पेडणेकर, रितेश देशमुख, यांनी हजेरी लावली.

गोव्यामध्ये लग्न केल्यानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या या कपलचे चाहते नव जोडपे रकुल आणि जॅकीचे फोटो पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. जॅकी भगनानी हा चित्रपट निर्माता आहे. रकुल एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रकुल लवकरच 'इंडियन 2' या चित्रपटात दिसणार आहे. तर, जॅकी प्रसिद्ध प्रोड्यूसर आहे. त्याचा देखील 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकीची लव्हस्टोरी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. दोघेही शेजारी होते. पण त्यांना कधीच कळले नाही. मैत्री नव्हती, पण लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यात एक बॉन्ड तयार झाला आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. रकुल आणि जॅकीने 2021 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आता या कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. येत्या २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत कायमची जॅकी भगनानीची होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

Urmila Matondkar: जणू बार्बीडॉलच! वयाच्या ५१ व्या वर्षी उर्मिला मातोंडकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहून विश्वास बसणार नाही!

Maharashtra Live News Update: परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

UPI Cash Deposit: कॅश डिपॉजिट कराचीय, पण बँकेच्या गर्दीचं टेन्शन आलंय? UPI मिटवेल चिंता, जाणून घ्या पैसे जमा करण्याची प्रक्रिया

Mughal harem : मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळी कोणते नियम पाळावे लागत असत?

SCROLL FOR NEXT