Swara Bhaskar Baby Bump Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar Baby Bump Photos: कुणीतरी येणार येणार गं! स्वरा भास्करने शेअर केली बाळाच्या आगमनाची तयारी

Swara Bhaskar Cradle Photos: स्वरानं बेबी बंप दाखवताना एक फोटो शेअर केला असून बाळाच्या आगमनाबद्दलही तिनं शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Chetan Bodke

Swara Bhaskar Baby Bump Photos:

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांचे २०२३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा सर्वांनाच आश्चर्याचा सु:खद धक्का बसला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशातच अभिनेत्रीने लग्नाच्या पाच महिन्यानंतर चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आता स्वरानं बेबी बंप दाखवताना एक फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने बाळाच्या आगमनाबद्दलही तिनं शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्वरा भास्कर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अभिनेत्रीने तिची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्रीने जून महिन्यामध्ये एक क्यूट फोटोशूट करत चाहत्यांना गुडन्यूज शेअर केली होती. नुकतंच अभिनेत्री आणखी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्वराने बाळाच्या आगमनाच्या तयारीबद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “आमच्या घरी छोट्या बाळाचं आगमन होणार असल्यामुळे घरातील काही जागा पाळण्याने घेतली आहे. पण, त्या पाळणावर एका वेगळ्याच व्यक्तीने कब्जा केला आहे. पुढच्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, पाळण्यावर हक्क दाखवणारा आहे, त्याने तो पाळणा सोडण्यासाठी नकार देतेय!” अभिनेत्रीच्या त्या पोस्टमध्ये तिचा एक बेबी बंप दाखवताना फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये बाळाच्या पाळण्यामध्ये मांजर झोपलेली दिसत आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, स्वराने ‘निल बटे सन्नाटा’, ‘तनु वेड्स मनु’ और ‘रांझणा’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण केली. अभिनेत्री २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जहां चार यार’ या चित्रपटातून ती अखेरची प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सध्या स्वराचा ‘मिसेज फलानी’ प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रडल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आश्चर्यकारक 5 फायदे तुम्हाला माहित आहे का?

'दृश्यम'पेक्षाही भयंकर! पतीला गुंगीचं औषध, बॅटने मारहाण अन् घरातच सिमेंटचा कट्टा... त्या' एका कॉलने उलगडलं मोठं रहस्य

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पहिला हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Hight Growth Tips : तुमच्या मुलांची उंची वाढत नाहीये? 'हे' ६ उपाय नक्की ट्राय करा, महिनाभरात दिसेल रिझल्ट

Maharashtra News Live Update: मन नदीत बैलगाडी उलटून भीषण दुर्घटना; २८ वर्षीय तरुण बेपत्ता, चार बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT