छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतल्यावर प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येतो. शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा इतिहास चित्रपटात पाहिलाय आणि पुस्तकात वाचलाय. परंतु हा इतिहास तेवढाच मर्यादीत नाहीये. शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचाही विचार करत नसे. अशाच एका मावळ्याची कथा सांगणारा 'सुभेदार' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
लोकप्रिय दिग्दर्शत दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक' मधील हा पाचवा चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. चित्रपटातील कलाकारही खूप चर्चेत आहे.
तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका अजय पुरकर साकारणार आहे. आपल्या दमदार आवाजाने ओळखल्या जाणाऱ्या अजय पुरकर याआधीही अनेक चित्रपटात झळकले होते.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नुकतीच चित्रपटातील सर्व कलाकारांनी सिंहगडावर गेलेत. तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिंहगडावर जाऊन चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. सिंहगडाचे नाव आधी कोंढाणा होते.
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर शिवाजी महराजांनी या गडाला सिंहगड नाव दिले. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातील 'शिवबा राजं', 'मावळ आम्ही वादळ आम्ही', 'मावळं जागं झालं रं' ही गाणी गायली. या गाण्यातून चित्रपटाच्या संपूर्ण टीमने तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली.
अवधूत गांधी, देवदत्त बाजीसोबत चित्रपटातील कलाकारांनी गाण्याला साद दिली. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने सिंहगडाची सफर केली. यावेळी त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीने हार पुष्पगुच्छ घातले.
'सुभेदार' हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चिन्मयय मांडलेकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मृणाल कुलकर्णी जिजामाता यांच्या भूमिकेत आहे.
याचबरोबर स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, आस्ताद काळे या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.