ott platform Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Releases This Week: विकेंड ठरणार हाऊसफूल, 'हे' धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरीज होणार प्रदर्शित

विकेंड प्लॅन करताय. मग नक्कीच ओटीटीवर हे चित्रपट आणि वेबसीरिज आवश्य पहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

OTT Releases This Week: आठवडाभराच्या वर्कलोडनंतर विकेंडला कोणता प्लॅन करायचा असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यासाठी कोणी फिरायचा प्लॅन करत असतं तर कोणी घरातचं आराम करणे पसंद करते. पण तुम्ही जर सिनेमाप्रेमी असाल आणि विकेंडचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा. कारण या विकेंडला ओटीटीवर अशा काही धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरीज रिलीज होणार आहेत ज्यामुळे तुमचा हा विकेंड खूपच खास होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या वेबसिरीज आणि चित्रपट चला जाणून घेवू.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक धमाकेदार वेबसिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. डिसेंबर महिन्यातील या विकेंडलाही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा महाडोस पाहायला मिळणार आहे. कारण या विकेंडला जी ५, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, तसेच डिस्ने हॉटस्टारवर अनेक वेबसिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पाहूया या धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरीजची ही यादी

फिजिक्स वाला - हा एज्युकेशन बायोपिक शो १५ डिसेंबरपासून Amazon Mini TV वर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षक अलख पांडे यांची ऑनलाइन कोचिंग सुरू करण्यासाठीची आवड आणि संघर्ष दाखवण्यात येणार आहे.

गोविंदा नाम मेरा - विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १६ डिसेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे, तर निर्माता करण जोहर आहे.

420 IPC - हा चित्रपट 17 डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म झी फाइव्हवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात गुल पनाग, विनय पाठक आणि रणवीर शौरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

इंडिया प्रिडेटर: बीट ऑफ बॅंगलोर - हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल. ही एक डॉक्युमेंटरी आहे, यात एका गूढ व्यक्तीने एका महिलेची केलेली निर्घृण हत्येचा थरार दाखवण्यात येणार आहे.

टिकू वेड्स शेरू - 'टिकू वेड्स शेरू' हा आगामी बॉलिवूड ड्रामा चित्रपट आहे, जो साई कबीर दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट कंगना राणौतचा पहिला प्रोडक्शन चित्रपट असेल ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली बनवला जात आहे. हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे.

Edit By: Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT