hrithik roshan  saam tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan: हृतिक बनला खास व्यक्तीसाठी सांताक्लॉज, चाहत्यांकडून होतय कौतुक....

सध्या हृतिक रोशन एका केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने बराच चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Hrithik Roshan: सध्या सर्व देश ख्रिसमस हा सण साजरा करण्यात दंग आहे. त्यातल्या त्यात अनेक कलाकारही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत. सध्या सर्वच कलाकार ख्रिसमस निमित्त आपल्या खास शैलीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोण आपल्या परिवारासोबत तर कोण आपल्या चाहत्यांसोबत साजरा करत आहे. असाच खास ख्रिसमस यावेळी हृतिक रोशनने साजरी केली आहे.

सध्या हृतिक रोशन (Hrithik Roshan) 'फायटर' या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे (Bollywood Film). गेले अनेक दिवस तो त्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सध्या तो एका केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने बराच चर्चेत आला आहे. त्याने भारतीय लष्कराला सांताक्लॉज बनून खास भेट वस्तू दिल्या आहेत. त्यावेळी त्याने भारतीय जवानांसोबत आपला खास वेळ घालवत सेलिब्रेशन केलं.

या भेटवस्तूमध्ये त्याने अधिकाऱ्यांना जिमचे वर्कआउट साठी काही खास भेटवस्तू दिल्या आहेत. यामध्ये लेग पुल डाउन, लेग एक्सटेंशन, रोलिंग मशीन, स्क्वोट रॅक लेग प्रेस मशीन इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. हृतिकचे हे खास गिफ्ट पाहून सर्व अधिकारीही खुश झाले. हृतिकच्या या कृतीबद्दल सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. (Indian Army)

दरम्यान हृतिकच्या या आगामी ‘फायटर’ चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारतीय सेनेचं साहस, बलिदान आणि देशभक्ती चित्रित करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारतीय पातळीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT