BMC सर्वसामान्यांवर थेट कारवाई मात्र, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर मेहरबान ! Saam Tv
मनोरंजन बातम्या

BMC सर्वसामान्यांवर थेट कारवाई मात्र, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर मेहरबान !

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई नाही - लोकायुक्तांच्या सुनावणीत पालिकेचे स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) एकीकडे सर्वसामान्यांवर थेट कारवाई करते मात्र दुसरीकडे अभिनेते बच्चन (amitabh bachchan) यांच्यावर मेहरबान झाल्याचे दिसून आले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई नाही असे लोकायुक्तांच्या सुनावणीत पालिकेचे स्पष्टीकरण दिले आहे.

हे देखील पहा-

रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने पालिकेने प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई न केल्याचं स्पष्टीकरण पालिकेने लोकायुक्तांसमोर दिले आहे. लोकायुक्त न्यायमूर्ती व्हीएम कानडे यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात, बीएमसीने असे म्हटले आहे की, जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्याकडे रस्ता कंत्राटदार नाही आणि त्यामुळे सध्या महापालिका बच्चन यांच्या बंगल्याचा आवश्यक भाग ताब्यात न घेणार नाही आणि पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडुन पुढची कार्यवाही करु असं महापालिकेनं म्हंटले आहे.

काँग्रेस नगरसेविका ट्यूलिप मिरांडा यांनी महाराष्ट्र लोकायुक्तांकडे तक्रार केली होती की बीएमसी 2017 पासून रस्ता रुंदीकरणासाठी बच्चन यांच्याकडून जमीन ताब्यात घेण्यात अपयशी ठरली आहे. याबाबत लोकायुक्तांकडे सुनाववणी होती. मात्र, या सुनावणीत पालिकेचा अहवाल लोकायुक्तांनी मान्य केला नसून पुढील सुनावणीत पालिका कारवाई काय करणार याच स्पष्टीकरण मागितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

SCROLL FOR NEXT