Badshah SAAM TV
मनोरंजन बातम्या

Badshah : रॅपर बादशाहच्या क्लबजवळ झाला मोठा स्फोट, हल्लेखोर बाईकवरुन आले अन्...; पुढे काय घडलं?

Rapper Badshah : प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या क्लबजवळ स्फोट झाला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah ) त्याच्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजवर त्याने अनेक हिट गाणी दिली आहे. बादशाहा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे नाव पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत जोडलं जात आहे. अशात आता गायक बादशाहच्या चंदीगडमधील क्लबजवळ स्फोट झाला आहे.

मंगळवारी पहाटे बादशाह क्लबजवळ स्फोट झाला. हा बार चंदीगड सेक्टर 26 मध्ये आहे. दोन लोक बाईकवरून आले आणि क्लबमध्ये स्फोटकं फेकली. मंगळवारी पहाटे 2.30- 2.45 दरम्यान हा स्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र क्लबच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. एकंदर क्लबच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

बादशाहच्या क्लबजवळ स्फोट केलेल्या गुन्हेगारांविरुद्ध पोलीसांनी तपास सुरू केला आहे. बातमी कळताच चंदीगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिकची लोक घटनास्थळी लगेच पोहचली.

मीडिया रिपोर्टनुसार, खंडणीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला आहे. धमकीच्या स्वरूपात ही घटना घडली. या घटनेनंतर चंदीगड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलीसांनी सुरक्षा वाढवली आहे.

रॅपर बादशाहा विविध भाषांमध्ये गाणी गातो. त्याची पंजाबी गाणी खूप हिट आहेत. बादशाहा मोठा गायक, संगीत निर्माता आणि रॅपर आहे. त्याच्या गाण्याच्या अंदाजाने त्याने तरुणाईला वेड लावले आहे.

सुरूवातील हा स्फोट बादशाहच्या क्लबमध्ये झाल्याचे सांगितले जात होते. मात्र आता पोलीसांनी खुलासा केला आहे की, हा क्लब बादशाहाचा नसून त्याच्या जवळचा आहे. हा स्फोट खरा चंदीगडमधील देओरा येथील किंग्ज नाईट क्लब सेव्हिलमध्ये झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT