Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानने शिकार केलेल्या 'त्या' काळवीटाचे स्मारक उभारले जाणार

ज्या ठिकाणी हरणाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी स्मारकासह एक मोठे प्राणी बचाव केंद्र बांधले जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यापासून त्याने सार्वजनिक ठिकाणी जाणे बंद केले असून त्याच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. काही काळापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिष्णोई समाजातील लोक काळ्या हरणाला देवाचा अवतार मानतात आणि सलमानवर काळवीट मारल्याचा आरोप आहे.

24 वर्षांपूर्वी 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान शिकारीसाठी गेला होता तेव्ह या हरणाच्या शिकारीचे प्रकरण समोर आले होते. बिष्णोई समाजातील लोक काळ्या हरणाला देवाचा अवतार मानतात. त्यामुळे आता कांकणी गावात याच काळवीटचे मोठे स्मारक उभारले जाणार आहे. ज्या ठिकाणी हरणाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी स्मारकासह एक मोठे प्राणी बचाव केंद्र बांधले जाणार आहे. सात बिघा जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे.

हे देखील पाहा -

हे स्मारक 3 फुटांचे असणार आहे, ज्याचे वजन 800 किलो असेल. यासोबतच एक रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार असून तेथे प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले जाणार आहेत. कांकणी गावात या हरणाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. गावातील लोकांनी देणगी जमा करून हे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गावातील रहिवासी हनुमान राम विश्नोई यांनी सांगितले की, जेव्हा सलमान खानने येथे काळ्या हरणाला मारले तेव्हापसून लोक प्राण्यांना वाचवण्यासाठी स्मारक बांधण्याची मागणी करत होते जेणेकरून लोक प्राण्यांचे संरक्षण करायला शिकतील. जनावरांना वाचवायचे आहे, हे लक्षात राहावे म्हणून हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी बांधले जाणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला जामीन मंजूर केला होता. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन काळवीट मारल्याप्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्यावेळी नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेही सलमानसोबत शिकारासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून बिश्नोई टोळीच्या लोकांनी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Back Pain: खुर्ची किंवा खराब पोस्चर नव्हे, मेंटल स्ट्रेसही बनू शकतो कंबरेच्या दुखण्याचं मोठं कारण

Maharashtra Live News Update : स्वतःची कारखानदारी वाचवण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलू नये

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, २५ वर्षे पक्षात काम केलेल्या माजी नगराध्यक्षाने हाती धरलं कमळ

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

Chanakya Niti: या ५ ठिकाणी माणसाने कधीच पाऊल ठेवू नये, नाहीतर इज्जतीला लागेल कलंक

SCROLL FOR NEXT