Bipasha-Debina Baby Bump Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bipasha-Debina Baby Bump: देबिना बॅनर्जी-बिपाशा बासू यांच्या मॅटर्निटी शूटवर लोक संतापले, म्हणाले- 'ही भारतीय संस्कृती नाही'

बिपाशा बासूने नुकताच तिचा नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Celebrity Maternity Photoshoot Controversy: 'आई' होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात सुखद अनुभव असतो. या जगात नवीन जीव येणार ही भावना अनेकांचे आयुष्य बदलते. गरोदरपणात शारीरिक बदलांसोबतच विविध अनुभव स्त्रियांना येत असतात. गेल्या काही वर्षांपासून भारतातही मॅटर्निटी फोटोशूटचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. परदेशातून आलेली ही संस्कृती भारतीय महिलांनाही आवडू लागली आहे. परंतु या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये आता बोल्डनेस दिसू लागला आहे. मॅटर्निटी फोटोशूटमधील हा बोल्डनेस विशेषतः सेलिब्रिटी करताना दिसून येत आहेत. मात्र भारतातील अनेकांना हा बोल्डनेस समजत नसल्याने नवीन वाद सुरू झाला आहे.

टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. नुकताच तिने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी तिचे कौतुक केले. तर काही लोकांनी त्यावर टीका केली. ही आपली भारतीय संस्कृती नाही, असे व्हिडिओ पाहून लोक म्हणत होते. (TV)

मातृत्व शूट करण्याची कल्पना भारतात हॉलिवूडमधून आली. अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी असे शूट केले आहे. त्या फोटोशूटमध्ये दिसणारा बोल्डनेस हा त्या संस्कृतीचा भाग असल्याने तिथे कोणीही आक्षेप घेत नाही. पण जेव्हा हा ट्रेंड भारतात आला तेव्हा तो इथे खूपच नवीन होता. अगदी भारतीय पेहरवापासून ते गाऊन, टी-शर्टपर्यंतच्या शूटकडे लोकांनी एक नवीन बदल म्हणून पाहिले. पण जेव्हा त्यात बोल्डनेस आला तेव्हा हे शूट लोकांना आवडेनासे झाले. (Hollywood)

बिपाशा बासूने नुकताच तिचा नवीन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. त्यानंतर लगेच देबिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. लोकांना सेलेब्रिटी मॅटर्निटी फोटोशूट दरम्यानचा बोल्डनेस अजूनही कळत नाहीये. (Celebrity)

देबिनाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश नेटकरी हे अयोग्य आहे, असे सांगत आहेत. एका यूजरने म्हटले की, 'तुम्ही नेकेड टमी का दाखवत आहात, हा ट्रेंड त्रासदायक आहे. मातृत्व सुंदर असते आणि आपण मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे चांगले नाही, परदेशात असे केले जाते, ही आपली संस्कृती नाही.’ तसेच देबिनाने गरोदरपणात हिल्स घातलेले सुद्धा लोकांना आवडलेले नाही. (Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT